Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढील आयुष्य. " थवेच्या थवे जमून, या सरकारी अविचाराचा प्रतिकार करण्याकरितां वाटेल. त्या कल्पना निघू लागल्या. परंतु त्या प्रक्षुब्ध स्थितीतही ज्याचा सल्ला आप- णास विचारला पाहिजे, व जो आपल्या कल्याणाची निरंतर चिंता करीत अस ल्यामुळे त्याच्या सल्ल्याप्रमाणें वागण्यांत आपलें हित आहे, असा एक वडील माणुस घरांत आहे, याची त्यांना आठवण झाल्याखेरीज राहिली नाहीं. हां हां म्हणतां अण्णासाहेब यांच्या घराभोवतालची जागा व चौक वगैरे जनसमूहानें भरून गेले, व त्यांतील शिष्ट शिष्टांचा दिवाण- खान्यांत शिरकाव होऊन जो तो अण्णासाहेब यांस " आतां आम्हीं काय करावें ? म्हणून विचारूं लागला. एक शहू जर त्या वेळेस अण्णासाहेब यांनी अधिक उणा काढला असता अथवा दोन समाधानाचे शब्द अधिकार वाणीने सांगितले नसते, तर साऱ्या पुण्यास आग लागून गेली असती, व त्याच्या ज्वाळा आणखीही किती पसरल्या असत्या, कोणी सांगावें ? परंतु या सर्वही गोष्टींच्या ते विरुद्ध असल्यामुळे यापैकी कांहीही न करता त्यांनी बाहेर येऊन चार साध्या शब्दांनी लोकांची अंतःकरणे थोडी शांत केली, व त्या काली उचित असे त्यांचे कर्तव्य करण्यास त्यांस घरी धाडून दिलें. त्यामुळे पुण्यांतील एक मोठा अनर्थ टळला. या गोष्टीची लोकांस नसली तरी सरकारी अधिकाऱ्यांस खास जाणीव असेल. पुढे लौकरच अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनास ज्या वेळेला अत्याचार होण्याच्या भीतीमुळे कलेक्टरकडून परवानगी मिळेना, तेव्हांही पुण्यांतील सर्व लोकांची हमी आपल्याकडे घेऊन अण्णासाहेब यांनी त्या उत्सवाची वाट चालू केली. असो. या वर्षांतील विशेष गोष्ट म्हणजे रावबहादूर गणेश व्यंकटेश जोशी, आणि अण्णासाहेब यांचा जडलेला स्नेह. रा. ब. जोशी हे त्यांच्या जबर व्यासंगामुळे व लेखन व्यवसायामुळे सुप्रसिद्धच आहेत. केर हार्डी यांनी Living State- stical Encyclopaedia म्हणुन त्यांचा मोठा गौरव केला होता, व ज्या ज्ञानाच्या जोरावर नामदार गोखल्यांनी आपला लौकिक संपादन केला, तें त्यांनी जोशीबुवांच्या पायापाशी बसूनच मिळविलें होतें, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. यांचा जन्म सरकारी नौकरींत गेला, परंतु पाण्यामधुन कमळाचें पान बाहेर काढावें, तसें सरकारी नौकरीच्या दुष्परिणामांचा लेप न होतां तें बाहेर पडले. यांचा स्वभाव शांत, सरळ, निर्भीड, एकमार्गी, आणि मोठा कडक व करारी होता. सारीं