पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ पुढील आयुष्य. ठिकाण नाहीं, म्हणून तेही फार चडफडत. अखेरीस अण्णासाहेब यांस न सांगतांच त्याचें लग्न उरकून घ्यावें, असाहि विचार करूं लागले. परंतु रागा- च्या आवेशांत कांहीही बोलले तरी अण्णासाहेव यांची अवज्ञा करण्याची त्यांची हिंमत नव्हती, म्हणून तेही अखेरीस तसेच चालते झाले. नानासाहेब यांच्या जाण्यानें मात्र अण्णासाहेबांस कुटुंबांत खरे एकटे पडल्या- सारखे झाले. कारण नानासाहेब यांचा अण्णासाहेबावर तसाच जीव होता. असें कांही म्हणावयास हरकत नाहीं कीं नानासाहेब होते, म्हणून अण्णा- साहेब हे संसारी माणसाप्रमाणें थोडेसे नीट रहात असत. अण्णासाहेबांस काय आवडतें, व काय लागतें, याचें धोरण ठेवून मुकाट्यानें तसें करणें, ही नाना- साहेबांच्या सुखाची एक मोठीच गोष्ट होती. प्रापंचिक अडचणींनीं त्रासून गेल्यामुळे ते अण्णासाहेब यांस वाटेल तसे बोलत. परंतु तुकाराममहाराजांच्या उक्तीचा आधार घेऊन अण्णासाहेबांवर अनेक प्रकारची ओझीं लोक ठेवूं लागले की त्यांचा जीव थोडथोडा होत असे. या लोकांतील आर्त असे खरोखर थोडेंच असावयाचे, व पुष्कळसे स्वार्थसाधुच असत. “या लोकांमुळे अण्णा- साहेबांस फार त्रास होऊन त्याचे हाल होतात, " म्हणून त्यांना अशा लोकांचा मनापासून तिटकारा येई, व त्यामुळे अशा लोकांवर कोश धुंडूनही सांपडणार नाहीं, असल्या शिव्यांची लाखोली वाहाण्याचे त्यांचेकडे एक कामच होतें. त्या लोकांमिळतीं अण्णासाहेव आपला वेळ फुकट घालवितात, व संसाराकडे एकादा तासही न देतां कुटुंबांतील माणसांचे हाल करतात, म्हणून अण्णासाहेबांचीही हजरी घेण्यास ते कमी करीत नसत. परंतु दुसरीकडे पहावें तों, अण्णासाहेव यांचा शौचकूप धुवून काढण्याचाही त्यांचा नित्य नेम होता. अशा स्थितीत बावाच्या लग्नासारख्या सामान्य गोष्टींत अण्णासाहेबांनी त्यांना नाराज केले याविषयी अशी समजूत आहे की, बाबास मोठें थोरलें गंडांतर असल्याचें अण्णासाहेब यांस कळलें होतें, व तें टळून जाईपर्यंत त्यांनी मुद्दामच लग्नाची गोष्ट लांबणीवर टाकली. या सभ जुतीत किती तथ्य असेल कोण जाणे, परंतु एक गोष्ट मात्र खरी की १९०५ सालीं बाबासाहेब यांस फार मोठे दुखणें होऊन त्यांची सर्वांनी आशा सोडून दिली होती, अशा स्थितीत त्यांचा पुनर्जन्म झाला. त्यानंतर पुढें लाग-