Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वागलु. १३५ दिवशीं सांगितली, व कोणावर गदा येत आहे, या विचारांत पडले. इतक्यांत आमची बायको आजारी असल्याचे त्यांस माहीत नव्हतें, त्यांस तिला देवाज्ञा झाल्याचें कळलें. या स्वप्नांत व बायकोस श्रीचें झालेल्या दर्शनाच्या प्रकारांत फार साम्य आहे. .२९ । ९१९०२" 66 अण्णासाहेब सांगत असत कीं, "आपण तीस महाराजांचें नांव घेण्यास सांगावें, परंतु तें नांव मोठें व कठीण म्हणून तिला घेतां येऊं नये. तेव्हां तिनें म्हणावें कीं, तुमच्या महाराजांचें नांव मोठें लांबच लांव, माझ्या तोंडाला नाहीं येत." त्यावरून अण्णासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे त्या शिवपंचाक्षरीचा जप नेहमीं करीत असत. अंतकाळी त्यांना महाराज जवळ बसले आहेत असें वाटे, व त्यामुळे बाहेरच्या कोणत्याही पदार्थाकडे न पाहतां डोळे मिटून त्या दर्श- नाच्या आनंदांत पडून रहावें, असे त्यांना वाटे. अण्णासाहेब सांगत, " ती सांगे ' डोळे उघडले म्हणजे इतर माणसें कशी माकडासारखी वाटतात. डोळे मिटले म्हणजे महाराज जवळ वसलेले दिसतात व जिकडे तिकडे मोठी प्रभा भरून गेलेली दिसते. ' त्यावरून 'माझ्या महाराजांचे नांव मोठें कठीण म्हणून घेत नव्हतीस ना ? पण अखेरीस तेच तुझ्याजवळ आले की नाही ? " अशी आपण त्या प्रसंगही थट्टा केल्याचें ते सांगत. बागलु हा अण्णासाहेब यांचा नातु म्हणजे त्यांच्या मुलीचा ( सौ. मथुताईचा ) मुलगा. त्याच्यावर अण्णासाहेबाचा अत्यंत जीव होता, आणि या 'वज्रादपि कठोर' कातळांत हा मधुर पाण्याचा झरा मध्येंच कोठून आला, याचें अण्णासाहेबाचा चांगलाच परिचय असणाऱ्यांना नवल वाटे. लहानपणापासून त्यांनी त्यांनला वागविलें. एक क्षणभरही त्याला कधीं विसंविलें नाही. कौटुंबिक माया अण्णा- साहेब यांच्या अंतःकरणास कधीं शिवली असेल असे वाटत नाही. मग इतका जीव असण्याचे काय कारण असेल तें असो. एक गोष्ट मात्र खरी की, "बाग- लूचे मुखानें महाराज बोलतात " अशी त्यांची खात्री होती, व त्या विष- यींचें २१३ अनुभवही ते एकादे वेळेस सांगत. त्यांतीलच हा वर सांगितलेला एक होय. यावेळी त्या मुलाचें वय फार झाले तर ७१८ वर्षांचें असावें. अशा वेळी इतर शुभ प्रसंगी ज्याप्रमाणे महाराजांचें अदृश्य रीतीनें प्रत्यक्ष अस्तित्व असतें त्याचप्रमाणे असल्या महत्त्वाच्या प्रसंगीही महाराज हजर असलेच पाहि- जेत, आणि त्यांची पूजा झाली पाहिजे, एवढी कल्पना त्याच्या डोक्यांत यावी कै. म. म. द. वा. पोतदार, जंथसंग्रह