Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. अण्णासाहेब यांचा एक अनुभव. १३३ आचार वगैरे मोठा संतोषकारक आहे. तुमच्या हातून तें होईल. " पुढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादस्वामींनीं अनुष्ठान केलें आणि त्याप्रमाणे त्यांची इच्छाही पूर्ण झाली, व श्रीदत्तात्रयांचा सहवास होऊन भाषणादिक व्यवहारही होत असत. परंतु या गोष्टीची कल्पनादेखील कोणास नव्हती. श्रीपादस्वामींनी पुढील आयुष्य एकाद्या सामान्य संन्याशाप्रमाणे शांतपणानें घालविलें. धुळ्याच्या उत्स- चास जावयाचें म्हणून अण्णासाहेब त्यांना भेटावयास गेले असतां, 'आतां तुमची आमची भेट पुन्हा होणार नाहीं, ' म्हणून श्रीपादस्वामींनी त्यांना सांगितलें, अण्णासाहेबांनी विचारले, असे कां ? ' तेव्हां त्यांनी सांगितले की “ शरीराचा अतिशय कंटाळा आला, दोन चार वेळां जावें असे वाटलें, परंतु श्रींची परवानगी नव्हती. आतां या खेपेस आज्ञा झाली आहे, येत्या शुक्रवारों आम्ही देह ठेऊं. " त्यानंतर आपले सर्व चरित्र त्यांनी अण्णासाहेबांस सांगि- तलें, व वरील हकीकत सांगून महाराजांचे उपकार आठवून डोळ्यांस पाणी आणले. पुढे अ हेब धुळ्यास गेले, व मागें श्रीपादस्वामी समाधिस्थ झालें. ही गोष्ट वैशाख शु॥ ९ शुक्रवार शके १८२४ रोजी झाली. १८२२ माघ वुवासाहेबांच्या निर्याणानंतर थोडे दिवसांनी म्हणजे शके शु॥ १० गुरुवार या दिवशीं अण्णासाहेबांनी “श्रीसद्गुरूंच्या आज्ञेनें 'मी कोण ?' याचा अनुभवसहित शोध करण्याचा प्रारंभ " केला, व पुढें लौकरच म्हणजे १८२३ सालीं केव्हांतरी त्यांना “अंतर्बहिश्च व्याप्य नारायणः स्थितः । इति श्रुतिवाक्यस्य साक्षात्परिचयोऽभूत् " असा अनुभव येऊन, “ नारायणः श्रीनृसिंहसद्गुरु देव एव इति निश्चयो जातः ” अशी त्यांची स्थिति झाली. श्रीपादस्वामींच्या समाधीनंतर लौकरच, म्हणजे शके १८२४ आषाढ ९ मंगळवार या दिवशी त्यांचे कुटुंब स्वानंदवासी झाले. प्रथमपासूनच त्यांची स्थिति एकाद्या कुटीचकासारखी होती, व संसार म्हणजे निमित्तालाच होता. परंतु त्यांचे कांहीही असले तरी घरांत सौ. मातुश्री रमाबाईसारखा थोर जीव सह- धर्मिणी म्हणून होता, त्यामुळे त्यांना कुटुंब व्यवस्थेकडे किंचितही पाहण्याचें कारण कधीं पडलें नाहीं. यांचीं अनेक धोरणें संभाळून खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांनी ठेवावी, व बाहेरील व्यवहार नानासाहेब यांनी पहावा, अशी सहज स्थिति होती. १९०२ सालीं सौ. रमाबाई व त्यानंतर पुढे थोडक्याच काळांत नानासाहेब आणि जिच्यावर त्यांचा जीव होता अशी त्यांची थोरली