Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० पुढील आयुष्य.. महाराजांनी कुंडलिनीच्या ज्या 'सप्रभव वैभवाचें' वर्णन केले आहे, तो षट्- चक्रभेदरूपी हठयोग होय. असो. यावरून एक गोष्ट मनांत येते की, कोणच्याही मार्गानें कां होईना, ज्या स्थळीं मनुष्य पोहोंचला असतां तेथून सर्व मार्गाचें हृद्रत समजतें आणि सर्व साधनमार्ग करतलामलकवत् होतात, अशा एका स्थळीं तरी निदान अण्णा- साहेब उभे होते. स्वतः त्यांच्या भाषणांत उपासनेखेरीज इतर मार्गांचे व त्यांतील अवस्था, अनुभव आणि पद्धति यांचे उल्लेख दोनतीन वेळां, अगदा त्यांचा अनुभव असल्याप्रमाणे आलेले ऐकण्याचा प्रसंग सुदैवानें लेखकासच आला आहे; त्यावरूनही असेंच वाटतें. अण्णासाहेब हेही त्यांचें ' म्हणणे ( नित्यपठण ) म्हणत असतां प्रत्येक उच्चाराबरोबर मस्तकावर विशेष तऱ्हेनें न्यास करीत, आणि त्यांच्या " म्हणण्यांत " सहस्रदल पंकजस्थ परमात्म्याचाच उल्लेख होता, यावरूनही मागें एका प्रकरणांत ( स्थित्यंतर ) केलेल्या अनुमानांनाच बळकटी येते. असो. दुसऱ्या दिवशीं रीतिप्रमाणें, प्रसाद होऊन बुवासाहेब धुळ्यास गेले, व तेथेंच त्यांचें शके १८२२ वैशाख शु॥ द्वादशी या दिवशीं देहा- वसान झाले. पुढे मंडळीच्या विचारानें अण्णासाहेब यांना पूर्वी दाखविलेली जागाच कायम होऊन तेथेंच त्यांना समाधी दिली गेली, व हळू हळू काम सुरू होऊन, केवळ अण्णासाहेब यांच्या प्रयत्नांनींच संस्थानास आजचें स्वरूप आलें. समाधीच्या जागेस जोडून असलेली बाग धर्मशाळा वगैरेची जागा कससारखा अधिकारी असल्यामुळे मिळेल अशी कोणासच आशा नव्हती, फक्त अण्णासाहेबच सांगत असत कीं, 'ती जागा मिळावी अशी महाराजांची इच्छा आहे, तुम्ही प्रयत्न करा. त्याप्रमाणे बरीचशी खटपट झाल्यावर अखेरीस ती जागा मिळून संस्थानला आजचें स्वरूप आलें. प्रतिवर्षी पुण्यतिथीकरितां धुळ्यास जावयाचा अण्णासाहेबांचा नेम होता, व त्यांच्याकरितां अनेक निमित्तांनीं विद्वान्, औषधार्थी आणि भाविक असे चांगले चांगले लोक जमून तेथें मोठा आनंद उडत असे. स्वतः अण्णासाहेब हे बुवा- साहेबांस केवळ महाराजस्वरूपच समजत असत. 'महाराजांनी त्यांना अगदी आपल्यासारखेच केलें, त्यांत एवढे देखील ठेवलें नाहीं रे, ' सालीं त्यांनी मला सांगितल्याचें आठवतें. एकादशीच्या दिवशी धुळ्यास पोद्दों- चावयाचें आणि पौर्णिमा झाल्यावर तेथून निघावयाचें, असा सामान्य शिरस्ता असे १९१३