पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) पराधे गुरोर्दण्डः ' असे होण्याचा फार संभव असतो. परंतु सुदैवानें तेवढ्या- बाबतीत मी निर्धास्त आहे. कारण की, जरी श्रीअण्णासाहेब यांचे संगतवार चरित्र कोणांस फारसें माहीत नसले तरी त्यांचे आयुष्य इतकें उघड्यावर गेलें आहे व त्यांची सर्व प्रकारें योग्यता किती मोठी होती याची सर्वांस इतकी निर्विवाद जाणीव आहे कीं, प्रमादस्थळीं गैरसमज न होतां पूर्वी सांगितलेल्या इंग्रजी ह्मणी प्रमाणेच (fools rush in where augels fear to tread ) उद्गार वाचकांच्या तोंडून बाहेर पडतील यांत शंका नाहीं. तेव्हां आतां अधिक तें काय लिहावयाचें आहे. सरते शेवटीं त्या अकुंठशक्तिस्वरूप योगेश्वरास एवढीच प्रार्थना आहे कीं, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवध देशांतरा पाठवा । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहू तोषवा ॥ तथाऽस्तु । पुणे बुधवार पेठ. श्रावण शुद्ध १५ सोमवार क्षक १८४८ तथाऽस्तु ! } तथाऽस्तु । अप्रबुद्ध