पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूर्णतेचा प्रत्यक्ष पुरावा, ९३ कांही तरी 'अमुक मनुष्य येऊन भेटला' असा उल्लेख सांपडेल, तर त्याच्याच पुढें लगेच, १८९३ मधल्या एकाद्या गोष्टीविषयीं कांही वाक्यें लिहिलेली सांप- डतील, त्यांतच एका ठिकाणी 'ममच मामकानां इत्यादिनांच सर्वेषां देवता- घटित जीव व त्याचें शरीर यांचे महाराजांशी ऐक्य झाले' असा स्वतंत्र उल्लेख आहे ! या सबंध आयुष्यांतील तुटपुंज्या गोष्टी सोडून दिल्या, तर स्वतःच्या स्थिति निदर्शक उद्गार त्यांनी काढल्याचें कोणास सांगतां येणार नाहीं; तरी पण त्यांचा सर्व आयुष्यक्रम या उगारांच्या जोडीस ठेवून पाहिले असतां काय प्रकाश पडतो, तें ज्याचें त्यानें पहावें. त्यांतही लक्षात ठेवण्याजोगती गोष्ट ही आहे कीं, असेंच त्यांचे राहणें त्यांना ३६ वर्षे पाहिलेले सर्व लोक सांग- तात. साधारणतः मद्रासहून आल्यावर जी त्यांच्या राहण्याची घडी बसली, तीच अखेरपर्यंत होती; फरक काय तो बाह्य व्यापारांचा. त्यावरूनही असेच वाटतें कीं स्वतःस कांहीं मिळवावयाचें उरले होते म्हणून त्यांनी तपश्चर्या केली, अथवा कांहीं साधन केलें, असे नसून खरोखरच ते आमच्याकरितां केलें. अशीच त्यांच्या साधनांचही स्थिति आहे. सर्व प्रकारच्या उद्योगांत गढून गेलेल्या त्यांनी स्नानसंध्या वगैरे नित्यकर्मापलीकडे व महाराजांची पूजा आरती वगैरे करण्यापलीकडे कांहीं केल्याचे कोणीही कधी पाहिल्याचें सांगत नाही.. नाही म्हणावयास महाराजांचें नांव व त्यांचा स्वतःचा कांही उपासनामंत्र एवढे मात्र जोराजोरानें म्हणतांना त्यांना कित्येकांनी ऐकले असेल. सारांश, साधक म्हटला म्हणजे चित्तैकाग्रथ ध्यानधारणा, योगसाधनें, भजनकीर्तन, वगैरे ज्या कांही कल्पना डोक्यांत उभ्या राहतात, त्यांतील एकही गोष्ट करतांना कधीं ते दिसले नाहींत. आणि त्यावरून ईश्वरभक्तीस लागलेल्या व त्याचा पाया म्हणून देवदर्शन घेणे, देवास प्रदक्षिणा घालणे, साधूसंतांस नमस्कार. करणें, दानधर्म करणें, पारायणें, पूजाअर्चा करणें, वगैरे केवळ प्राथमिक अव- स्थेतील माणसाप्रमाणे ते हुबेहुब दिसत. अशा स्थितीत कल्पना तरी काय करावयाची ? स्वतः त्यांच्या विषयां या बाबतीत तर ते अवाक्षरही काढीत नसत. गायत्रीचें पुरश्चरण अथवा पुरश्चरणें केल्याचा आणि बारा वर्षे निंबाचा पाला खाल्ल्याचा असे दोनच उल्लेख त्यांच्या बोलण्यांत आले होते; परंतु त्यावरून कांहीं विशेष बोध होत नाहीं. आणि दुसरीकडून तर 'आपण सर्व अनुभव घेतले, ' असे ते म्हणत; यांची संगति कशी बसवावयाची ? परंतु