Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सालरजंग प्रकरण व मद्रास. त्यावर "आपण तें ताट राहूं द्यावें, मी दुसरें सिद्ध करवितों' म्हणून अण्णा- साहेबांनी विनंती केली. तेव्हां-'छे, छे, स्वामीचा प्रसाद तो ! त्यानें खाल्लेले कसें टाकावयाचें?' असे म्हणून ते त्याच ताटावर बसले, व त्या कोशिंबिरीसुद्धां सर्व प्रसाद ग्रहण केला ! मात्र कोशिंबीर पुन्हा घेतली नाहीं. यथाक्रम पुण्यास येऊन पोहोचल्यावर अण्णासाहेब हे स्वामींस घेऊन आळंदीस गेले. परंतु त्यापूर्वी त्यांच्या परिपाठाप्रमाणे ओंकारेश्वरास गेल्यावेळी श्रीकाळबोवा यांचे दर्शनास गेले होते. काळबोवा यांची दिगंबर व अखंड मौनवृत्ति प्रसिद्धच आहे. अण्णासाहेबांनी नमस्कार करतांच आळंदीकडे तोंड करून ' स्वामी दादा आला, ' असे ते मोठ्याने ओरडले ! पुढे आळंदीस जाऊन महाराजांचें दर्शच घेतांच, महाराजांनी नेहमीच्या हास्यमुद्रेनें ' येण्या- पूर्वी कुठे गेला होतास रे ? ' म्हणून नुसती खूण दिली; व कांही न बोलतां मनांत समजून अण्णीसाहेब हेही बाजूस बसले. महाराजांनी कंचांच्या स्वामींचा मोठा गौरव करून ' हा कोहिनूर आहे, दक्षिणेतला साक्षात् अगस्ति, ' असें सांगितलें. रामचंद्र अय्यांनीही अण्णासाहेबांकडे पाहून 6 याला तुमच्या कडे आणून पोहोंचविला, आतां आमची कामगिरी संपली, ' म्हणून सांगितलें. थोड्याच दिवसांनी रामचंद्रअय्या परत गेले. त्यानंतर पुन्हां एकदां लहर लागून ते असेच अण्णासाहेब यांचेकडे आले होते. तेव्हां मात्र त्यांचा मुक्काम ३।४ महिने पुण्यास होता. “ बाहेर तुळशी वृंदावनापाशी बसलेले असत. तिखटाचा मोठा थोरला गोळा घातलेली दाण्याची चटणी त्यांना लागे, व तेलगू येत नसल्यामुळे त्यांच्याशी बोलतांना ' आमच्या हिची ' मोठी तिरपीट उडे, " म्हणून अण्णासाहेब गमतीनें सांगत, ३१४ महिन्यांनंतर ते परत देश गेले, व पुन्हा मात्र केव्हांही इकडे आले नाहीत. कंचीस त्यांची समाधी आहे, असे समजतें,