२ TS Suvaburi “२ - 1BOD ॥ श्रीः ।। ( आचार्यभक्त विष्णुकृत मराठी) बृहद्योगवासिष्ठसार. अथ वैराग्यप्रकरणम् ।
ooxoc -
ॐ तत्सब्रह्मणे नमः । श्रीगणेशाय नम । वाल्मीकि, व्यास, श्रीशकराचार्य इत्यादि वेदाता- चार्यास अनन्यभक्तीने वदन करून मी हे बृहद्योगवासिष्टसार स्वबुद्धि- शुद्धयर्थ लिहितो. सर्ग १-या सर्गात-वेदातसप्रदायाच्या शुद्धाकरिता ऋषि व देव याचा मवाद आणि रामाच्या अज्ञानाचे कारण वर्णिलं आहे. हा सर्ग वृट्योगवासिष्टाचा उपोद्घात आहे, असे मटले तरी चालेल ज्यान्यामुळे ही सर्व चराचर भूते भासतात, ज्याच्यामुळेच त्याची स्थिति होते आणि प्रलयसमयी सर्व ज्याच्यामध्ये लीन होतात त्या स-य स्वरूप परमात्म्यास नमस्कार असो. ज्ञाता ( जाणणारा ), ज्ञान ( जाण . ण्याचे सावन ), ज्ञेय ( ज्ञानाचा विषय ), द्रष्टा, दर्शन, दृश्य, कर्ता, करण, कार्य, इत्यादि त्रिपुश्या ज्याच्या योगाने सिद्ध होतात त्या : नरूप परमात्म्यास नमस्कार असो. म्वर्गापासून ब्रहालोकापर्यत जे ऊोज आहेत त्यात रहाणा-या देवादिकामये व या लोकातील मनुष्यापार स्थावरापर्यंत प्राण्यामध्ये कमी-अविक प्रमाणाने व्यक्त होणारे आनदा, कण ज्याच्या सत्तेमुळे स्फुरण पावतात व जे सर्व प्राण्याचे जीवन आहे त्या आनदरूप ब्रह्मास नमस्कार असो पूर्वी एकदा सुतीक्ष्ण नामक कोना एका ब्राह्मणास मोक्षाच्या साधनाविषयी सशय आला, व त्याच्या निरस- नार्थ तो आपल्या गुरूच्या ह्मणजे अगस्त्य मुनीन्या आश्रमास जाऊन त्यास मोठ्या आदराने विचारू लागला. सुतीक्ष्ण-भगवन् , मला एक सशय आला आहे, व आपण सर्व धर्मास जाणणारे आहा, ह्मणून मी