२२ बृहयोगवासिष्टसरि. वृद्ध गुरूचे म्हणणे ऐकल्यास तुझें अकल्याण कधीही होणार नाही. मोह- वश होणे चांगले नव्हे. कारण मोह झणजे अविवेक; त्याच्या योगानें अनेक अनर्थ प्राप्त होतात. पण जो त्याचा त्याग करितो, त्यास आपत्ति स्पर्शही करीत नाहीत. या गोष्ठीचा तूं चांगला विचार कर." इतकें बोलून दशरथ स्वस्थ बसला असता मुनिवसिष्ठ जरा हंसत ह्मणाले-राजपुत्रा, तूं मोठा शूर आहेस. कारण तू दुर्जय विषयशत्रूसही जिंकलें आहेस. धैर्या- वाचून शौर्य येत नाही, हेही आह्मास माहित आहे. तेव्हां स्वाभाविक धैर्य सोडून एकाद्या अज्ञाप्रमाणे तूं या मोहजालांत कसा सांपडलास 2 याचे मोठे आश्चर्य वाटते. नतर विश्वामित्र रामास ह्मणाले-अरे बा सत्पुरुषा, मनाचे व नेत्राचे चांचल्य सोडून, तू असा कां मोहित होत आहेस, तें ग्गग. उदीर ज्याप्रमाणे घरास पोखरतात त्याप्रमाणे मानसिक व्यथा तुझ्या शरीरास पोखरीत आहेत. पण त्याचे कारण काय ? तुझ्या सारख्या सद्गुणी बालकास भलतीच काही चिंता लागली असेल व त्यामुळे तू झुरत अस- शील, असे समजणे अगदीच अयोग्य आहे. यास्तव मनात कांहीं न आणतां तुझ्या चिंतेचे खरे कारण आमास सांग. ह्मणजे हे सच्छील दाशरथे, पुनः तुला असे कष्ट होणार नाहीत; असा उपाय आह्मी योजू. विश्वामित्राचे हे भाषण ऐकून रामाच्या चित्तास जरा समाधान वाटले व त्यामुळे त्याच्या मुखाकर थोडीशी आनंदाची छाया आली ११. सर्ग १२-भोगांचे दुखरूपत्व, विषयाचे असत्यत्व व संपत्तीचे अनर्थत्व याचे येथे रामाने वर्णन केले आहे. नतर तो सद्गुणी राजपुत्र ह्मणाला-मुनिवर्य, मी या शुभ गृ- हात उत्पन्न झालों व या माझ्या पूज्य पित्याच्या कृपेमुळे वाढलो. गुरुकुलात वास करून मी विद्यासपादन केली. पुढे सदाचारयुक्त होऊन मी भूमीवर यात्रा करीत हिडलो. इतक्यांत संसारावरील आस्थेस नाहीसे करून सोडणारा हा विवेक माझ्या मनात उद्भवला भोंगाविषयीं माझी बुद्धि निरस झाली. या प्रचड ससारात सुख मुळी तरी आहे काय ? प्रत्येक प्राणी मरण्याकरितां उत्पन्न होतो. कारण जो एकदा जन्म घेतो त्यास मेल्यावांचून सुटकाच नाही. जन्माबरोबर मरण त्याच्या बोकाडी येऊन बसते. प्राणी मरणास टाळण्याकरिता जरी प्रयत्न करीत राहिला तरी अखेर मृत्यूचाच जय होतो. तसेच जो मरतो तोही पुन:
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/२६
Appearance