२० बृहद्योगवासिष्ठसार. संन्याशाप्रमाणे अथवा तपस्व्याप्रमाणे राहण्याची फार इच्छा दाखवितो. एकातस्थळी सुद्धा तो हंसत नाही, गात नाही, की रडत नाही. तर अव्या तळ हातावर गाल टेंकून मनांतल्या मनात काही चिंतन करीत बसतो. तो कोणत्याही गोष्ठीचा अभिमान धरीत नाही; हे राज्य व गृहादि माझे आहे, असे त्याला वाटत नाही; व आपण राजा व्हावे ही त्याला इच्छा नाही; सुख व दुःख या दोघांनाही तो एकसारिखेच लेखितो; त्याचे खरे हृद्गत आझास कळत नाहीं; तो प्रत्यही अधिक अधिक कृश होत आहे; दिवसें दिवस त्याचे शरीर निस्तेज होत आहे; प्रतिदिनी त्याची विरक्ति वाढत आहे; आपल्या ज्येष्ठ भ्रात्याची ही दशा पाहून कुमार लक्ष्मण व शत्रुघ्नही तसेच क्षीण व दीन होऊ लागले आहेत. सवक व माता यातील कोणालाही तो आपल्या या अवस्थेचे कारण सागत नाही. त्याचा ज्याच्यावर अतिविश्वास आहे, अशा एकादोघा मित्रांशी एकातात बोलतांना " प्रथम थोडेसें सुख व परिणामी असह्य दुःख देणाऱ्या या विषयोपभोगात निमग्न होऊ नका," असे त्यास बजावून सागतो. कोणतीही उत्तम वस्तु त्याच्या पुढे आणा; तो त्याच्या नाशाचे चिंतन अगोदर करितो. " अरेरे, परमानदपदप्राप्ति करून न घेता, व्यर्थ चेष्टा करीत, प्राणी आपले आयुष्य घालवीत आहेत," असे व्यवहारात तत्पर असलेल्या लोकाकडे पाहून तो मोठ्या खेदाने पण हळुच ह्मणतो. 'राम- भद्रा, तू सार्वभौम राजा हो,' असे कोणी झटल्यास तो त्याच्याकडे पाहून हसतो; "धन सर्व विपत्तींचे कारण आहे, यास्तव आपल्याजवळ जे असेल ने सत्पात्री अर्पण करा," असे तो सर्वास सागतो. " अरे, हे मूढ प्राणी, हाय हाय करून आक्रोश करीत असतात; पण विषयाविषयी विरक्त होत नाहीत," असे ह्मणून तो विस्मित होतो. साराश राजाधिराज, राजपुत्राने आमास खिन्न करून सोडले आहे. हे जग ह्मणजे एक मिथ्या कल्पना आहे, असे तो जाणतो. शत्रु, मित्र, स्वपर, आप्त, इष्ट इत्यादिकातील कोणावरही त्याची आस्था नाही. " मला या सर्वास घेऊन काय करा- वयाचे आहे ? " असे तो नेहमी ह्मणत असतो. कौसल्यासुताची ही वृत्ति कोणी पालटूं शकेल, असे आझास तर वाटत नाही. तरी पण आपण समर्थ आहा. काही उपाय योजा. आता त्याची अधिक 'काल उपेक्षा करणे हितावह नाही १०.
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/२४
Appearance