Jump to content

पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरण-सर्ग ३. नाच्या अनुष्ठानाचे शेवटी वासनात्यागात पर्यवसान होईल, असाच शुद्ध क्रम ठेवावा. एकदा या वासनासमूहाचा क्षय झाला की मग मन शिथिल होण्यास वेळ लागत नाही. कारण वासनांचा पुजका ( समूह ) हेच मनाचे स्वरूप आहे. यास्तव थडीचा मारा कमी झाला असतां बोचा गोळा जसा वितळून जातो त्याप्रमाणे वासना क्षीण झाल्या की मनही नाहीसे होते. पक्ष्यास अडकवून ठेवण्याकरिता जसा लांकडाचा किवा लोखडादिकाचा पिजरा करितात त्याप्रमाणे प्राण्यास अडकवून ठेवण्याक- रिता देह हा एक पच भूताचा पिजराच केलेला आहे, व त्याची उत्पत्ति आणि अस्तित्व या वासनासमूहावरच अवलबून असतात. यास्तव वासनाचा क्षय केला असता देहाचाही क्षय होणे अगदी सहज आहे, देहक्षया- वाचून दु.खांचा क्षय होत नसतो, व देहक्षयानतर दु ख होणे शक्य नाही. शुद्ध व मलिन अशी वासना दोन प्रकारची आहे त्यातील मलिन वासना जन्मास कारण होते व शुद्ध वामना जन्माचा नाश करते. कारण मलिन वासना हे बीज असून अज्ञान (ह्मणजे आत्म्याचे यथार्थ ज्ञान नसणे ) हे क्षेत्र (शेत ) आहे दृढ अहकार हा त्या वासना वीजास पाणी घालणारा शेतकरी ( माळी ) असल्यामुळे राग ( आवडत्या वस्तूविषयी प्रेम ) व द्वेष ( नावडत्या वस्तूविषयी क्रोध ) याच्या द्वारा त्यास जन्म हा अकुर येतो, व शुद्ध वासना, अहकार, राग, द्वेष आणि अज्ञान यानी रहित असल्यामुळे भाजलेल्या बीजाप्रमाणे पुनर्ज- न्मरूप अकुगस कारण होत नाही. भाजलेल्या बीजापासून अकुर उत्पन्न होत नाही, हे सर्व लोकास ठाऊक आहेच. आत्म्याचे ज्ञान हाच अग्नि असून त्याने अज्ञान क्षेत्रास जाळून टाकिल्यावर त्यातील वासनाबीज भाजल्यावाचून कमे राहील ? पण भाजलेले बी पेरण्याच्या उपयोगी जरी नसले तरी ग्वाण्याच्या उपयोगी जसे पडते त्याप्रमाणे शुद्ध वासना पुनर्जन्माच्या जरी उपयोगी नसली तरी ती देह धारण करू शकते, व आत्मसाक्षात्कार झाल्यानतरही प्रारब्धाचा भय होईतो देह असावाच लागतो. अशा या शुद्ध वासनेने जे युक्त असतात व त्यामु- ळेच पुनर्जन्मरूपी अनर्थाचे पात्र होत नाहीत ते कृतकृत्य व ज्ञातज्ञेय पुरुष जीवन्मुक्त होत. ज्याना काहीएक कर्तव्य राहिलेले नसते ते कृत- कृत्य व ज्याना काही ज्ञातव्य म्हणजे जाणावयाचे राहिलेले नसते ते