१. वैराग्यप्रकरण-सर्ग १. आणि " मोक्ष धनाने मिळत नाही, कर्माच्या अनुष्ठानाने मिळत नाही किवा शुद्ध सततीच्या योगानेही मिळत नाही; तर तो केवल सर्वसंगपरि- त्याग केल्यानेच मिळतो" या वचनानी सागितलेला निवृत्त धर्म आहे. पण अशा एकमेकाच्या विरुद्ध उपदेश करणान्या दोन प्रकारच्या श्रुति व स्मृति आढळत असल्यामुळे, काय करावे हे मला समजत नाही. बाबा, एवढ्याच करिता मी कमें सोडून असा स्वस्थ बसलो आहे आपल्या प्रिय पुत्राचे हे दीन व अज्ञतुल्य भाषण ऐकून अग्निवेश्य त्यास पुनः म- णाला-बाळा, मी तुला एक गोष्ठ सागतो ती ऐक, तिचे तात्पर्य तू मनात आण, व मग तुला वाटेल तसे कर. कारण कोणतेही काम विचार केल्यावाचून व आपल्या समजुतीप्रमाणेच करू नये. सुरुचि नामक एक श्रेष्ट अप्सरा एकदा- ज्याच्यावर पुष्कळ मयूर आहेत, जेथे कामसंतप्त किन्नरी किन्नरासह क्रीडा करीत आहेत व मोठमोठ्या पापांच्या भारांस नष्ट करून सोडणाऱ्या भागीरथीचा प्रवाह ज्याच्यावरून वहात आहे- अशा हिमालयाच्या शिखरावर बसली होती. इतक्यात अतरिक्षातून जात असलेला इंद्राचा एक दूत तिच्या दृष्टी पडला त्यास ती ह्मणाली- बा देवदूता, तुझे कोठून आगमन झाले ? तू आता कोणत्या कामाकरिता गेला होतास ? देवदूत-अप्सरे अरिष्टनेमि ह्मणून एक राजा आहे. विरक्त झालेल्या त्याने आपले राज्य पुत्रास देऊन तप करण्याकरिता वनात गमन केले. तो महात्मा या समोरच्या गधमादन पर्वतावर तप करीत आहे. त्याच्याकडे मी काही कामाकरिता गेलो होतो, व तेथूनच हा मी आता परत येत आहे. तेथील वृत्तात सागण्याकरिता मला पुन: इद्राकड जावयाचे आहे. हे ऐकून ती सुरुाचे झणाली-तेथे असा को- णता मोठा वृत्तात झाला आहे ? कृपा करून तो मला सागशील का ? देवदूत-हो, तुला न सागण्या सारिखे त्यात गुप्त काही नाही. तो राजा वनात येऊन दुस्तर तप करू लागला असता, देवेद्र मला ह्मणाला- दूता, तू हे उत्तमोत्तम विमान घेऊन जा व त्या राजास त्यात बसवून स्वर्गभोग भोगण्याकरिता येथे घेऊन ये. स्वामीची ही आज्ञा शिरसा मान्य करून मी सर्व उपकरणासह विमान घेऊन तेथे गेलो, व लग जास इब्राची आज्ञा कळविली. पण तो सशयी राजा मला दूता, स्वर्गातील सर्व गुण-दोष मला साग. ते ऐक
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/११
Appearance