पूर्ण:- त्या वेळीं, हे भगवन् हे लोक फार चांगले आहेत; कारण ह्यांनीं माझ्यावर हातानें प्रहार केले नाहींत, असें मला वाटेल.
बुद्ध:- आणि जर त्यांनीं तुझ्यावर हातानें प्रहार केला तर?
पूर्ण:- मला त्यांनीं दगडांनीं मारलें नाहीं ह्मणून ते लोक चांगलेच आहेत असें मी समजेन.
बुद्ध:- आणि दगडांनी मारलें तर?
पूर्ण:- माझ्यावर त्यांनी दंडप्रहार केला नाहीं ह्मणून फार चांगले लोक आहेत असें मी मानीन.
बुद्ध:- आणि दंडप्रहार केला तर?
पूर्ण:- शस्त्रप्रहार केला नाहीं, हा त्यांचा चांगुलपणा आहे, असें मी समजेन.
बुद्ध:- आणि शस्त्रप्रहार केला तर?
पूर्ण:- मला ठार मारलें नाहीं, हा त्यांचा चांगुलपणा आहे, असें समजेन.
बुद्ध:- आणि तुला ठार मारलें तर?
पूर्ण:- भगवन् कित्येक भिक्षू ह्या शरीराला कंटाळून आत्मघात करितात. अशा शरीराचा जर सुनापरंतच्या रहिवाशांनीं नाश केला, तर त्यांनीं माझ्यावर उपकार केला असें होईल, आणि ह्मणून ते लोक फार चांगलेच, असें मी समजेन.
बुद्ध:- साधु (शाबास), पूर्णा साधु ! अशा प्रकारच्या शमदमानें युक्त होत्साता तूं सुनापरंत प्रदेशांत धर्मोपदेश करण्यास समर्थ होशील.
(मज्झिमनिकाय)
बुद्ध भगवंतांच्या परिनिर्वाणसमयीं त्यांचे सारिपुत्त मोगल्लानादि प्रमुख शिष्यांपैकीं महाकाश्यप हेच कायते