जातीमुळे कोणी चांडाळ होत नाहीं, किंवा कोणी ब्राह्मण होत नाहीं. कर्मानें चांडाळ होतो, आणि कर्मानेंच ब्राह्मण होतो.
हें तत्त्व बुद्धांनीं भिक्षुसंघांस पूर्णपणे लागू केलें होतें. कांहीं काळपर्यंत भिक्षुणींचा संघ त्यांनीं स्थापिला नव्हता. परंतु पुढें त्याचीहि त्यांनीं स्थापना केली. भिक्षुणी संघाला त्या कालच्या परिस्थित्यनुरूप कांहीं कडक नियम बुद्धांनीं घालून दिले होते. एवढ्यावरून बुद्धांनीं स्त्रीस्वातंत्र्याला विरोध केला, असें रा. ब. शरच्चंद्रदास सी. आय्. इ. ह्या तिबेटी भाषाभिज्ञ बंगाली गृहस्थाचें ह्मणणे आहे. बौद्ध धर्मावर कित्येक निराधार आरोप करण्यांत येतात, त्यांपैकीं हाहि एक आहे, असें मी समजतों.
हिंदुधर्मामध्ये स्त्रियांना आणि शूद्रांना वेदाधिकार नाहीं. त्यांनी पुराणांवरच आपली तहान भागविली पाहिजे. असा प्रकार कांहीं बौद्ध धर्मामध्यें नाहीं. बौद्धस्त्रियांना सर्व धर्मग्रंथ वाचण्याची मोकळीक आहे. आजला ब्रह्मदेशांत त्रिपिटक ग्रंथाचें अध्ययन केलेल्या आणि करणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. इंग्रज सरकारच्या तर्फेनें ब्रह्मी राजांच्या पद्धतीस अनुसरून पालिभाषेंतील बौद्ध वाङ्मयाची परीक्षा घेऊन कांहीं बक्षिसे वाटण्यांत येतात. ह्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन बऱ्याच स्त्रियांनीं बक्षीसें मिळविल्याचे मला माहित आहे.
मंगलसुत्तांत आणि सिगालसुत्तांत गृहस्थांनी गृहिणींचा आदर करण्याविषयीं बुद्धानें उपदेश केला आहे. अनाथ पिंडिक इत्यादि गृहस्थांनीं आपल्या गुणांनीं उपासकवर्गात जसें अग्रस्थान मिळविलें होतें, तसेंच उपासिकावर्गात विशाखा प्रभृति गृहिणींनीं विळविलें होतें. नकुलमाता नांवाच्या एका प्रमुख उपासिकेनें आपल्या पतीस केलेला उपदेश आपण ऐकाल तर तिला उपासिकावर्गात अग्रस्थान कां मिळालें होतें
पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/८२
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७२ )