Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६१ )

विण्यांत येते. नंतर ज्या ठिकाणीं जाऊन रहाण्यास त्यास सांगण्यांत येतें तेथें तो राहतो. नंतर भिक्षुसंघापैकीं दुसरा एक विद्वान् भिक्षु पुढे होऊन त्याला त्यानें कायकाय केलें पाहिजे, कोणत्या प्रश्नांचीं काय काय उत्तरे दिली पाहिजेत हे नीट समजावून सांगण्यासाठीं परवानगी मागतो. संघाची परवानगी मिळाल्यावर त्याला तो असेल तेथे जाऊन तो भिक्षु सर्व समजावून देतो; व सर्व गोष्टी समजावून दिल्याचें वर्तमान तो पुनः येऊन संघास कळवितो. तेव्हां संघ त्या उमेदवारास पुनः परत येण्यास सांगतो. संघ बसलेला असेल तेथें जाऊन उमेदवारानें संघाची येणें प्रमाणें त्रिवार प्रार्थना केली पाहिजे:- "भदन्त संघापाशीं मी उपसंपदेची याचना करितों. अनुकंपा करून संघ माझा उद्धार करो." नंतर दुसरा एक विद्वान् भिक्षु उपसंपदेला प्रतिबंध करणाऱ्या गोष्टींपासून हा नवीन उमेदवार मुक्त आहे किंवा नाहीं हें त्यास विचारण्याची संघाजवळ परवानगी मागतो. ती मिळाल्यावर तो भिक्षु त्याला प्रश्न करितो ते असे:-
 भिक्षु:- हे नाग (शूर) हा सत्य बोलण्याचा प्रसंग आहे. येथें घडलेली गोष्ट सांगितली पाहिजे. मी तुला आतां प्रश्न विचारणार आहे. जे असेल तें आहे, असें सांगितले पाहिजे. जें नसेल तें नाहीं ह्मणून सांगितलें पाहिजे. पुढील रोग तुला आहेत काय? कुष्टरोग तुला आहे काय?
 उमेदवार:- नाहीं महाराज. (नत्थि भन्ते.)
 भिक्षु:- गंडरोग?
 उ०:- नाहीं महाराज.
 भिक्षु:- किलास रोग?
 उ०:- नाहीं महाराज.

 भिक्षु:- क्षयरोग?


 बु० ६