हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५२ )
समुत्पादाचे यथार्थ ज्ञान करून घ्यावें आणि प्रज्ञा पूर्णत्वास न्यावी. कारण प्रज्ञेनेंच निर्वाणप्राप्ति होणार आहे.
सभ्यगृहस्थहो, याप्रमाणें अधिशीलशिक्षा, अधिचित्तशिक्षा आणि अधिप्रज्ञाशिक्षा यांच्या द्वारें बौद्ध धर्माचा सारांश आपणापुढे ठेविला आहे. विषय मूळचा फार कठीण आहे. त्याला सौम्य स्वरूप देण्याचा होतां होईल तों प्रयत्न केला आहे. तो कितपत साधला आहे, हें कांहीं माझ्यानें सांगवत नाहीं.