Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४३ )

धनीण खरोखरच शांतवृत्तीची आहे, किंवा मी वेळच्यावेळीं कामें करीत आहें ह्मणून तिला रागावण्याला संधीच सांपडत नाहीं? ह्या शंकेच्या समाधानार्थ आपल्या मालकिणीची परीक्षा पाहण्याचा तिनें बेत केला. व ती एके दिवशीं जरा उशिरांच उठली. तेव्हां ती वैदेहिका तिला ह्मणाली, "काय ग काली आज इतका उशीर कां केलास?" तेव्हां काली ह्मणाली, "बाईसाहेब सहज उशीर झाला." वैदेहिकेनें कपाळाला आठ्या घालून व भृकुटी वर चढवून ह्यटलें, "कसली ही पापी दासी उशीरां उठते ह्मणजे काय?" कांहीं दिवस गेल्यावर काली दासी आणखी थोडासा उशीर करून उठली. त्या दिवशीं बाईसाहेबांनी तिला बऱ्याच शिव्या दिल्या. आणखी कांहीं दिवस गेल्यावर बाईसाहेबांची पुनः एकदा परीक्षा पहावी ह्मणून कालीने उठण्यास फारच उशीर केला. मग काय विचारतां बाईसाहेबांचा क्रोधवन्हि एकदम भडकला. तिनें जवळ पडलेली लोखंडाची खीळ घेऊन ती कालीच्या डोक्यांत घातली. काली बिचारी घाबऱ्या घुबऱ्या आरडत ओरडत रस्त्यावर धांवली. तेथे शेजारी पाजारी गोळा झाले. व त्यांनीं कालीला काय झालें, तिच्या डोक्यांतून रक्त कां वाहते वगैरे चौकशी करण्यास आरंभ केला. तेव्हां काली त्यांस ह्मणाली, "आपण ज्यांना मोठ्या शांत समजत होतां त्या आमच्या बाईसाहेबांचें हे कृत्य आहे." ह्या कृत्यानें ही स्त्री साध्वी दिसत होती पण ती साध्वी नव्हे, ही मोठी क्रूर आहे, अशी वैदेहिकेची शहरभर अपकीर्ति पसरली.
 "भिक्षू हो, त्या कुलीन स्त्रीप्रमाणेच कांहीं भिक्षू जोपर्यंत कटु शब्द ऐकण्याचा प्रसंग आला नाहीं, तोंपर्यंत मोठे शांत दिसतात. परंतु जेव्हां एकाद्या भिक्षूवर कटु शब्दांचा प्रहार होतो, तेव्हां तो खरोखरच शांत आहे कीं नाहीं हें जाणण्याची