भिक्षू हो, जर एकाद्या भिक्षूची प्रत्यक्ष सुख प्राप्त करून देणाऱ्या चारीहि ध्यानांचा यथेच्छ लाभ व्हावा, सहज लाभ व्हावा, वाटेल तेव्हां लाभ व्हावा, अशी इच्छा असेल तर त्यानें शीलाचें उत्तम रीतीनें पालन केलें पाहिजे."
समाधि ह्मणजे चित्ताची एकाग्रता. तिचे अकुशल समाधि आणि कुशल समाधि असे दोन भेद आहेत. एकाद्या नाटकगृहांत नाटक चाललें असतां तेथील कांहीं श्रोते शृंगारपरिप्लुत पद्य ऐकून तल्लीन होऊन जातात. त्या प्रसंगी त्यांच्या चित्ताची जी एकाग्रता ती अकुशल समाधि होय. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या घातपातांत एकादा मनुष्य गढून गेला असतां त्याच्या चित्ताची तावत्कालिक एकाग्रता अकुशल समाधींत गणिली जाते. ह्या अकुशल समाधीचा अर्थातच अधिचित्तशिक्षेत समावेश होत नाहीं. केवळ कुशल समाधीलाच अधिचित्त शिक्षा ह्मणतात.
कुशल समाधीचे उपचार समाधि आणि अर्पणा समाधि असे दोन भेद आहेत. उपचार समाधि अल्पकाळ टिकणारी असते. लहान मूल उभे राहण्यास शिकत असतां फार वेळ उभे राहू शकत नाहीं, त्याप्रमाणे योग्याला आरंभींच साध्य होणारी उपचार समाधि फार वेळ टिकत नाहीं. अर्पणा समाधि उपचार समाधि साधल्यावर प्राप्त होते. ती अभ्यासानें पाहिजे तितकी टिकू शकते. तिचे ध्यानभेदानें चार भेद होतात. वितर्क विचार, प्रीति, सुख आणि एकाग्रता, हीं प्रथम ध्यानाचीं पांच अंगें. द्वितीय ध्यानांत वितर्क आणि विचार राहत नाहीं, बाकी तीन अंगें राहतात. तृतीय ध्यानांत प्रीति राहत नाहीं; सुख आणि एकाग्रता हीं दोन अंगें राहतात. चतुर्थ ध्यानांत एकाग्रता आणि स्मृति (जागृति) अशीं दोनच अंगे असतात. इतर ध्यानांतहि
बु० ४
पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/४७
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३७ )