Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८ )

 बोधिसत्वानें या प्रमाणें गृहत्याग केल्यावर तो राजगृह नगरास गेला तेथें त्या काली बिंबिसार नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यानें बोधिसत्वास भिक्षेसाठीं फिरत असतांना पाहिलें. हा कोणी तरी अद्वितीय पुरुष असावा असें त्यास वाटलें व तो जेथें बोधिसत्व रहात होता, त्या पांडव नांवाच्या पर्वतावर स्वतः गेला. तेथें बोधिसत्वाची भेट घेऊन त्यानें त्यास संन्यास सोडून क्षत्रियधर्म स्वीकारण्यासाठीं बराच आग्रह केला. परंतु बोधिसत्वाच्या निर्वाण प्राप्त करून घेण्याच्या दृढनिश्चयापुढें त्याचें कांहीं चाललें नाहीं. ही कथा सुत्तनिपातांतील पब्बजासुत्तांत वर्णिली आहे.
 यापुढील बोधिसत्वाचे वृत्त मज्झिमनिकायांतील महासच्चक सुत्तांत सांपडतें. त्याचें शब्दशः भाषांतर न देतां सारांश येथें देतों. सच्चक नांवाचा एक जैन (निर्ग्रन्थ) पंडित वैशाली नगरीत राहत असे. त्याला अग्गिवेस्सन असेंही ह्मणत, त्याला उद्देशून बुद्ध ह्मणतात:-
 "हे अग्गिवेस्सन, याप्रमाणें प्रव्रज्या धारण करून मी घरांतून बाहेर पडलों. परम सुखावह गोष्ट कोणती याचा मी शोध करीत होतों. अनुत्तर श्रेष्ठ शान्तिस्थानाचा पत्ता लावण्यासाठीं मी फिरत होतों. अशा समयीं आळार कालमाजवळ जाऊन त्याला मीं ह्मटलें कीं, भो कालाम, तुझ्या ह्या धर्मपंथांत प्रवेश करण्याची मी इच्छा करितों. तेव्हां कालम ह्मणाला


    होती तरी तिच्या निधनानंतर महाप्रजापतीने बोधिसत्वाचें पुत्रवत् पालन केल्याचा उल्लेख चुल्लवग्गांत सांपडतो. शिवाय महाप्रजापति बोधिसत्वाची मावशी असून सावत्र आई होती, असे वर सांगितलेच आहे. तेव्हां येथें महाप्रजापतीलाच आई हाटलें आहे, हे उघड आहे.