"हे गृहपतिपुत्र! पांच गोष्टींनीं पतीनें पश्चिम दिशा जी पत्नी तिची पूजा करावी:- (१) तिला मान द्यावा; (२) कोणत्याहि तऱ्हेनें तिचा अपमान होऊं देऊं नये; (३) अन्य स्त्रीशीं संबंध ठेवू नये (एकपत्नीव्रत आचरावें); (४) घरचा कारभार तिच्यावर सोपवावा; आणि (५) तिला वस्त्राच्छादनाची कमतरता पडूं देऊं नये. ह्या पांच गोष्टींनी जर पतीने पत्नीची पूजा केली तर ती पतीस पांच प्रकारांनीं उपकारक होते:- (१) घरांत चांगली व्यवस्था ठेवते; (२) नोकरचाकरांला प्रेमानें संभाळते; (३) पतिव्रता होते; (४) पतीनें मिळविलेल्या संपत्तीचें रक्षण करिते (उधळेपणा करित नाहीं); आणि (५) सगळ्या गृहकृत्यांत उद्योगी आणि दक्ष होते. याप्रमाणे जर पतीनें पश्चिमदिशा जी भार्या तिची पूजा केली तर ती त्याला सुखावह होते.
"हे गृहपतिपुत्र! पांच गोष्टींनीं गृहस्थाने उत्तरदिशा जे आप्तमित्र त्यांची पूजा करावी:- (१) त्यांना देण्यासारख्या असतील त्या वस्तु द्याव्या; (२) ते घरीं आले तर त्यांच्याशीं प्रियभाषण करावें; (३) त्यांचे काम पडल्यास तें करावें; (४) आपणासारखेच त्यांना लेखावें (ह्मणजे लग्नकार्यात व इतर ठिकाणीं ते आपणापेक्षां मानानें कमी आहेत असें समजून त्यांचा अपमान करूं नये); आणि (५) त्यांच्याशी निष्कपट वर्तन ठेवावें. ह्या पांच गोष्टींनीं जर गृहस्थानें उत्तरदिशा जे आप्तमित्र त्यांची पूजा केली तर ते त्या गृहस्थास पांच प्रकारांनी उपकार होतात:- (१) हा बेसावध असतां एकाएकीं याच्यावर कांहीं संकट आले तर त्या वेळीं याचें ते रक्षण करितात; (२) अशा प्रसंगी त्याच्या संपत्तीचेहि ते रक्षण करितात; (३) संकटामुळे हा घाबरून जातो तेव्हां ते त्याला धीर देतात; (४) विपत्ति आली तरी ते त्याला सोडित नाहींत; आणि (५) त्याच्या संततीवरसुद्धां ते उपकार करितात. याप्रकारें उत्तरदिशा त्या गृहस्थाला कल्याणकारक होते.
"हे गृहपतिपुत्र! पांच गोष्टींनीं धन्यानें खालची दिशा जे सेवक त्यांची पूजा करावी:- (१) त्यांचे सामर्थ्य पाहून त्यांनां काम सांगावें; (२) त्यांनां योग्य वेतन द्यावें; (३) आजारी पडले तर
पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/१०६
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९६ )