२४० बाळमित्र. उमा०- (अंमळ खजील होऊन), आता कसे करावें। विठू- ते तर मी तुह्मांला अगोदरच सांगितले, की आ- पले वचन संभाळावे. उमा०- ते माझ्या मनांत असले तर करीन, नाहीं तर माझ्या मानेवर कोणी सुरी ठेविली आहे? विठू- वाहवा, तुझी मोठे शहाणे तर ! प्राण गेला तरी वचनास मागे टळूनये, तसे कराल तर नाना तु- मची लबाडी लोकांत प्रगट करील. उमा०- मला लोकांशी काय प्रयोजन पडले आहे . पण सांग की मी वचन मोडून कांहीं घाल घुसड केली तर मग त्याला काय समजणार आहे ? विठ-ते तर त्याला तेव्हांच कळेल; मी त्यास सर्व कळविले आहे. उमा०- अरेरे, त्वां माझा भारी. घात केला. विलू,आ- तां तुझी माझी गडी तुटली. विठू- हे कायवरें, उमाकांतजी १ मी होऊन काही तुमचा घात केला नाहीं; तसे काही करतो तर म- जकडे दोष खरा. तो लबाड नाना. त्याने युक्तीनें- च फुसलावून माझे तोंडांतून वर्तमान काढून घेतलें, त्याने मला जर खरें विचारले असते तर मी त्या. ला ठिकाणा लागू दिला नसता. करार मोडणे आणि खोटे बोलणे सारखेच आहे. उमा०- तूं त्याचा मिलाफी दिसतोस, तूं कांही माझा स्नेही नन्हस.
पान:बाळमित्र भाग २.pdf/२४४
Appearance