Jump to content

पान:बाळमित्र भाग २.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. उमाकांताने पाहिले ह्मणून यंदा मजबरोबर त्याने वांटा कबूल केला आहे; तर तूं पाहीनास मी ह्यांत काय केलें बरें विठू- वाव्हारे ! भलाच धौताल्या दिसतोस. आपण एवढेसे पेढे आणि पैशाभऱ्याचे जांब देणार, आणि लोकांला फार मिळालेले असेल त्यांतून फसवून वांटा घेणार, ही चांगली मसलत; आणि तुझा तरी खरेपणा कोठे रडतो आहे ९ का एवढेच तुला मि. ळाले, किंवा आणखी काही अधिक आहे, हे को- णाला ठाऊक? नाना- आईची शपथ ! आपले डोळे जातील, वा आ. पण जर खोटे बोलूं तर. विठू- तुझें तुला काय चांगले वाटत असेल ते वाये. येवढ्याशा गोष्टी करितां धडाडां शपथा वाहतोस, काही तरी भय बाळगीत ना. मजजवळ शपथ वाहावयाचे काही प्रयोजन नाही. मी तिन्हाईत. पणे इतकेंच मात्र सांगतों की, असे करणे चांगले नव्हे. तुला अगदी थोडे मिळाले आणि उमाकां. तास पुष्कळ मिळालें, झणून त्यापासून वांय ध्या- वा, हा तुझा मनसुबा अगदी वाईट आहे. मला न्यास कळविले पाहिजे. नाना- तूं खुशाल जाऊन पाहिजे तसे कळीव, त्याचा मी अगोदरच बंदोबस्त करून चुकलों; कालरात्री त्याजकडे नांब व पेढे पाठवून देऊन निरोपही