यमा मुलगी. २११ णी खरा, परंतु ह्या तुझ्या उत्तम वागणुकेने आमचे जन्म सफळ झाले. असें ह्मणून तिघेही रडली. त्या काळी रामा शुद्धीवर आला होता, ह्मणून त्याने आई. बापांस प्रार्थना केली की, मी आजपर्यंत केवळ दुरा- चरणी होतो, परंतु इतःपर माझी वर्तणूक पाहून तु. झांस अतिशयित आनंद होत जाईल. इतक्यांत शेजारीण मातारीही काहीं अन्न घेऊन आली, तिने रामाचे उत्तम आचरण पाहिले, तेणेकरून तिचाही कंठ सद्गदित झाला, आणि तिनें रामास आ- शीर्वाद दिला. मग त्या चौघांनीही एके पंगतीस बसून भोजन केले. असें भोजन त्यांनी पर्वी कद्धीही केले नव्हते. त्यादिवसचा जो आनंद त्याच्या योगेकरून त्या उ- भयतांची प्रकृति दिवसें दिवस चांगली होत चालली, तेणेकरून रामासही अतिशयित सुख मिळं लागले. आणि त्यादिवसापासून त्याचे शेजारी पाजारी त्याज- वर पुत्रापेक्षा अधिक ममता करूं लागले. यमामुलगी. यमा पांच वर्षांची मुलगी होती; ती आपले आई . वर फार प्रीति ठेवीत असे, व सदा सर्वदा तिजपाशी रहावयास इच्छी; आईचा क्षणमात्र वियोग तिला सो.
पान:बाळमित्र भाग २.pdf/२१७
Appearance