Jump to content

पान:बाळमित्र भाग २.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० बाळमित्र. खेळावयाला आणावयाचे झाल्यास ते विद्याभ्या. सावरून बळे ओढावे लागतात, मी पैज मारवों की, ते दोघे रत्न पारखी ह्यावेळेस अभ्यासात गुं. तले असतील. दुर्गा- हे मी पक्के जाणते की, आमची थट्टा करावी हाच त्यांचा अभ्यास असेल. पण रावजींनी आप- णांस येथे खेळण्याची आज्ञा खरोखरीच दिली आहे की काय १ ही आपली खोली तर अगदीच लहान पडली; येथें फिरतां देखील येत नाही. शिव.- मजसारख्या सद्गुणी मुलाने विचारल्यावर ते नाही कसे ह्मणतील, वेडे पोरी पण तूं त्या पो. थ्या संभाळ हो. दुगा- तूं काय मला शहाणपण शिकवितोस ? मला ठाऊक आहे; मी त्या सर्व सोईने रचून ठेवीन. शिव०- (आंगी प्रौढता आणून. ) तें काम अस्मा. दिकांचे त्याची वहिवाट मजकडे आहे. दुर्गा- खरेंचरे बाबा, तुझ्याहून दुसरा कोण चतुर आहे. पण तुज बरोबर मला काम करणे प्राप्त आहे. मी अगोदर मोठ मोठाल्या पोथ्या दुसरे ठि- काणी नेते. शिव.- छे छे, बायकांनी त्यांस हात देखील लावू. नये; पण एक एक पोथी घेऊन माझे हातावर बरीक रचीत जा, येवढें काम कर ह्मणजे पुरे. दुर्गा-बरें, का होईना. (ती एकेक पोथी त्याचे हा-