जळती घरे. १५७ लई खराबी झाली आहे तर आपून जे काय मला शेत वगैरे दिले आहे ते आपून ध्यावें; हा आप. लाच माल आहे, दुजाभाव मनामधी आणूनका; असे केल्याने मला लई आनंद होईल, राजा.- बरें तर, तूं ह्मणतोस त्या पक्षी ह्यासमयीं मी घेतों; पण पुढे ह्याबद्दल तुला कांहीं दुसरे देईन, त्याला तूं ना ह्मणूंनको, माझ्या जहागिरीच्या स- नदांची पेटी वा आगीतून काढिली, आमचे वंश परंपरचे उपजीवन जिवाकडे न पाहतां त्वां रक्षिलें; तर आतां आझांस एथें घर दार कांहींच राहिले नाहीं, ह्याकरितां मी आपल्या जहागिरीच्या गांवीं जाऊन राहावे असे योजिले आहे; तेथे तुलाही सर्व खटल्या मुद्धा घेऊन जाईन, आणि वंशपरं- परा तुला पोटाची काळजी नपडे असे काही तेथे करून देईन. परशु०- बाबा, माझ्या ही मनांत असेच आहे; मला ह्यांनी फार संभाळले, नाही तर माझी दशा झाली असता. साक.- आतां उठा, चला आमचे घरांत जागा कांहीं शफारशी चांगली तुह्मां योग्य नाही, आपली सांक. डी आहे. आझां गरिबांचे घरांत आपली पायधूळ पडली ह्मणजे आमी लई सुखी होऊ. विठोजी- (आपला गाडा किती एक लोकांस घेऊ. न येत आहे असे पाहून ह्मणतो.) भाऊसाहेब,
पान:बाळमित्र भाग २.pdf/१५३
Appearance