पान:बालहक्क (Balhakk).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गोष्ट सारिकाची

 त्या दिवशी सारिकाताई सकाळी लवकरच आल्या. खरं तर मिटींग ११ वाजता होती. पण सारिकाताई ९ वाजता लेक लाडकी च्या ऑफीसवर हजर.

 एरवी उत्साहात 'गुड मॉर्निंग' म्हणणाऱ्या सारिकाताई आज शांत वाटत होत्या.वर्षाताईनी सारिकाला तब्येत बरी आहे ना? असे विचारले सारिका 'हो' म्हणाली.

'आज लवकर आलीस मिटींगला' वर्षाताई उद्गारल्या.


 'हो' आज सकाळी दुधाची गाडी आली होती गावात, त्या गाडीतूनच आले नंतर गाडीच नाही मिळत सारिका हातातली पिशवी उघडत म्हणाली. पिशवीतुन डबा काढत, सारिका वर्षाताईंना भाकरी' खाणार का ? गरमच आहे चुलीवरची सोबतहिरव्या मिरचीचा ठेचा पण आहे. अस म्हणत पुढे 'गावात रस्ताच नाही. त्यामुळे एस.टी नाही, वाहनांची सोय नाही.मग मिळालेल्या गाडीने फाटया पर्यंत यायचे. तिथून परत मिळेल त्या गाडीने शिरूर कासार पर्यंत यायचे. आज मला गावात दुधाची गाडी मिळाली, त्यामुळे लवकर पोहचले.

 सारिका लवकर पोहचण्याचे कारण सांगता सांगता गावात जायला रस्ता नाही आणि एस.टी नाही हे देखील सांगत होती. त्यामुळे गावातल्या मुली शाळेत जाऊ शकत नाही म्हणून ताई तुम्ही काहीतरी करा.

 वर्षाताईंनी ऐकून घेतल्यावर एक प्रश्न विचारला, अगं सारिका गाव कोणाचे

आहे? सारिका म्हणाली आमचे आणि पुढे विचारले रस्ता, एस. टी हे प्रश्न कोणाचे आहेत? सारिका म्हणाली, आमचे मग प्रश्न मी का सोडवायचे ?

२६