पान:बालहक्क (Balhakk).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न १९ बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या इतर कायद्याची नांवे सांगा व थोडक्यात माहिती द्या
उत्तर:१.  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (PCPNDT Act)

 गर्भधारणेपूर्वी किंवा प्रसुती होण्यापूर्वी गर्भातील बाळाचे लिंग सांगणे किंवा निवडणे यास सदर कायद्याने बंदी आहे.सोनोग्राफी मशिन किंवा जनुकीय तंत्रज्ञानाचा गैर वापर करुन मुली गर्भातच गायब केल्या जातात. गर्भातही मुलींचे संरक्षण करणारा हा कायदा आहे. याची अंमलबजावणी सिव्हील सर्जन व ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक करतात गाव पातळीवर कोणतेही अनुचित प्रकार आढळल्यास १८००२३३४४७५ या टोल फ्री नंबरवर तक्रार दाखल करावी

२. वैद्यकिय गर्भपाताचा कायदा १९७१.

■ गर्भलिंग निदानाला कायद्याने बंदी आहे. गर्भपाताला कायद्याने बंदी नाही.
■ गरोदरपणाच्या १२ आठवड्यापर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने शासनमान्य गर्भपात केंद्रामध्ये गर्भपात करून घेता येतो.
■ कोणत्याही मुलीस अगर स्त्रीस नको असताना गर्भधारणा झाल्यास १२ आठवड्यापर्यंत तिच्या विषयीची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवून तिला गर्भपाताची सेवा देणे गर्भपाताचा कायदा १९७१ नुसार बंधनकारक आहे.
■ त्यासाठी तिच्या लैंगिक जोडीदाराचे नाव सांगण्याची, त्याची लेखी परवानगी घेण्याची गरज नाही. २० आठवड्यापर्यंत देखील दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपाताची सेवा देता अगर घेता येते.
■ एका मुलीने एका मुलाला लग्नापूर्वी शरीर संबंधास संमंती देवू नये.
■ समजा असे काही घडलेच आणि त्यातून गरोदरपण आलेच तर गर्भपाताच्या कायदयानुसार गर्भपात करून घेता येतो आणि आपले भविष्यकाळातील आयुष्य इतर मुलींप्रमाणे मुक्त जगता येवू शकते.

■ कौमार्य नष्ट झाले, काचेचे भांडे फुटले, चारित्र्यहनन झाले अशा चुकीच्या समजुती डोक्यात घेवून, घाबरून जावून आत्महत्त्येसारखे मार्ग मुलींनी अवलंबू नयेत.

२२