पान:बालहक्क (Balhakk).pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

    जा.क्र. मनावि बलविवाह का ५९३.९४
   महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य
       दिनांक: २७.९३

प्रतिः मुख्य कार्यकारी अधिकारी
 जिल्हा परिषद (सर्व)

विषय: ग्राम पंचायतीच्या क्षेत्रामध्ये ग्रामसेवक यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती बाबत.

 बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ (२००७चा६) च्या कलम १६ व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन (१) उक्त क्लम १६ च्या पोट कलम (१) अन्वये ग्रामसेवक यांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये उक्त अधिनियमातील शक्तीचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे (२) उक्त क्लम १६ च्या पोट कलम (२) अन्वये संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविका बाल विवाह प्रतिबंधक अधिकान्यास सहकार्य करतील अशी अधिसूचना शासनाने दि. ३ जून २०१३ अन्वये निर्गमित केली आहे.सुलभ संदर्भासाठी शासन अधिसूचनेची मराठी व इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

 तरी सदर नियुक्ती बाबत व बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेसाठी आपले अधिपत्याखालील संबंधित यंत्रणांना आपले स्तरावरून सविस्तर सूचना देण्यात याव्यात.

स्थळप्रतीवर मा. आयुक्त यांची स्वाक्षरी असे.

      आयुक्त, महिला व बाल विवास
     महाराष्ट्र राज्य, पुणे.१ यांचे करीता

प्रतः मा. प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२ यांना माहितीस्तव सादर.

३०