पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७

पास्तूर ह्यांनी असे सिद्ध करून दाखविलें कीं, त्याच गो- ळ्या त्या रोगाचें कारण होत; त्या गोळ्यांच्या योगानें तो रोग इतर किड्यांत पसरतो; आणि ह्याप्रमाणें रोगी झा- लेले किडे मारून टाकून जर निरोगी किड्यांची जात वा- ढविली, तर तो रोग समूळ नाहींसा करितां येईल. आणि खरोखरच, लोक ह्या त्यांच्या सिद्धांतास अनुसरून वागूं लागल्यापासून रेशिमाचा धंदा सांवरला आहे, आणि पुनः पूर्ववत् चांगला लाभदायक झाला आहे. रोगी किडे धून काढण्याची पास्तूर ह्यांची कृति अशी आहे : – रेशि माचे किडे अंड्यांतून बाहेर आल्यावर कांहीं दिवसांनीं आपल्या आंगांतून रेशीम काढून तें आपल्या भोंवतीं लपे- टतात, आणि ह्याप्रमाणे बनलेल्या कोशिट्यांत कांहीं दिवस निजून राहिल्यानंतर रूपांतर पावून पतंगाच्या रूपानें बाहेर पडतात, ही गोष्ट सर्वोस माहीत आहेच. ह्याप्रमाणें कोशि- ट्यांतून पतंगाची मादी निघून तिनें अंडी घातल्याबरोबर, तीं अंडीं आणि ती मादी हीं स्वतंत्रपणे एका फडक्यावर ठेवितात. मादीला त्या फडक्याच्या एका कोपऱ्यावर टांचणी मारून तशीच वाळूं देतात, आणि नंतर तिला चिरडून तिचा देह सूक्ष्मदर्शक यंत्राने पाहातात. त्यांत त्या रोगाच्या गोळ्या आहेत असे दिसून आल्यास, तीं अंडीं आणि ती मादी हीं सर्व लांब नेऊन जाळून टाकि- तात. आणि ती निरोगी आहे असे दिसून आलें ह्मणजे त्या अंड्यांची जतन करितात. ह्याप्रमाणें रोगी किडे हळू हळू नाहींतसे होऊन निरोग्यांची संख्या वाढत जाते.
 ह्यानंतरचे पास्तूर ह्यांचे मुख्य शोध ह्मटले ह्मणजे दोन आहेत. पहिला गुरांच्या आजारांच्या संबंधानें आणि दु-