पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ अर्से हैं चमत्कारिक यंत्र आहे. त्याच्या योगानें म नुष्याचें भाषण आणि गाणें पुनः ऐकूं येतें एवढेच नाहीं, तर इंग्रजी व्यांडसारख्या अनेकस्वरप्रचुर वाद्यांचें वादन देखील त्यांत स्पष्ट ऐकूं येतें. तीं मेणाचीं नळकांडी पोष्टांतून पाठविण्याजोगतीं अ- सल्यामुळे त्यांचा उपयोग पत्रांप्रमाणेंही करितां येतो. "वाचका" स न ही नळी न बसवितां तुतारीसारखें प- त्र्याचें टोपण बसविलें तर आवाज दिवाणखान्यांतल्या सर्व लोकांस ऐकू जातो. 6 एकाद्या नळकांड्यावर “लिहिलेला" ध्वनि नकोसा अ- सल्यास, “लेखका" जवळ चाकूचें एक लहानसें पातें असतें, तें किंचित् खालीं करून यंत्र चालू करावें; ह्मणजे तें नळ- कांडें साफ होतें, आणि त्याचा पुनः उपयोग करितां येतो. एक भयंकर कारस्थान. धर्माभिमान फार विलक्षण आहे. त्याचे पायीं माणसं काय काय करायास प्रवृत्त होतात ह्याचा नेम नाहीं. जगाच्या इतिहासामध्ये पाहिले ह्मणजे असें दिसतें कीं, ह्या धर्माग्रहाच्या योगानें मनुष्यांच्या हातून जितकीं क्रूर- पणाची कर्मे आजपर्यंत झाली आहेत, तितकीं क्रूरपणाचीं कर्मे दुसऱ्या कोणत्याही मनोविकाराच्या योगानें झालेली नाहींत. असें एक भयंकर कृत्य अगदीं घडून येण्याच्या बेतास आलें होतें पण तें ईश्वरकृपेनें फार चमत्कारिक रीतीनें टळले. त्याची गोष्ट येथें सांगतों. इंग्लंड देशाची नामांकित राणी इलिझाबेथ ही इ० स० १६०३ ह्या वर्षी मरण पावली. तेव्हां तिच्या रा-