पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६२ थोरपणाची मोठी वाहवा केली. तेव्हां तो वृद्ध मनुष्य ह्मणाला, " चांगले काय, हें अथीनियन लोकांना ठाऊक आहे; आणि तें चांगलें करावें कसें हें लासिडिमोनियनांस कळत आहे." 1 अथीनियन लोकांचा स्वदेशाभिमान विचित्र होता. एकदां त्यांस दुसऱ्या एका संस्थानांतल्या लोकांशी लढ- ण्याचा प्रसंग आला. त्यावेळी त्यांच्या देवीनें असा कौल दिला कीं, ज्या पक्षाकडचा राजा आधीं मरण पावेल, त्या पक्षास यश खचीत येईल. आणखी, अथीनियन लोकांच्या राजास असे वाटलें कीं, आपणाभोंवतीं एवढा मोठा बंदो- बस्त असतो त्यापक्षी आपणास मरण लवकर येण्याची आशा नाहीं; आणखी आपणास जय तर पाहिजे. ह्म- णून, तो वेष तो वेष बदलून, आपल्या छावणींतून निघून शत्रूच्या छावणींत गेला; तेव्हां अर्थातच त्यांनी त्यास ठार मारिलें. ह्यावरून घ्यावयाचें एवढेच की, आपल्या पक्षास जय प्राप्त व्हावा ह्या हेतूनें त्या राजानें आपला प्राण दिला ! , . इसवी सनापूर्वी ४८० या वर्षी स्पार्टा संस्थानाचा सेनापति लिआनिडाज हा इराणी लोकांशी लढायास गेला तेव्हां त्याजबरोबर सैन्य थोडें होतें. पण, तो शत्रूस पाठ दाखवून परत आला नाहीं. तर, आपल्या सर्व लो- कांसह समरांगणीं पतन पावला ! स्वदेशाभिमानांत मरणें बरें ! परवशतेंतलें सुख नको ! सोलन ह्मणून जो एक नामांकित तत्त्ववेत्ता होऊन गेला, त्यानें आपल्या जन्मांतलें सुख मोजण्याचें माप सांगितलें आहे. तें हें कीं, “परोपकारांत आयुष्य घालवावें, आणि स्वस्थ चित्तानें मरावें." हें माप खरोखर अप्रतिम आहे.