Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५३ सगळी माणसं तेथून सारखी आहेत, ह्याचा अर्थ असा नाहीं समजायाचा कीं, पुरुष, बायका, आणि मुलें हीं स- गळीं सारखीं आहेत; तर, त्याचा अर्थ एवढाच ध्यावयाचा कीं, त्यांस जे वेगळे वेगळे हक्क आहेत, त्यांचें रक्षण का यद्यांनीं एकसारखें व्हावें, आणि त्यांत कोणा एकाच्या लाभाकरितां कोणा दुसऱ्याची हानि होऊं नये. जीवनार्थ कलह- दोन प्रकारचे प्रवाही पदार्थ एकत्र केले असतां, जड खालीं बसावा आणि हलका वर यावा, हा साधारण नि- यम आहे; आणि त्याचें ठळक उदाहरण पाणी आणि तेल ह्यांचें मिश्रण हें आहे. हा सिद्धांत जसा निर्जीव प्रवाही पदार्थांमध्यें अखंड चालला आहे, तसा एक सि द्धांत जीवंत पदार्थीमध्यें अखंड चालला आहे. तो हा कीं, प्रबल जीवंत पदार्थ आणि दुर्बल जीवंत पदार्थ ह्यांचा सं- गम झाला ह्मणजे, प्रबलानें उदयास यावें, आणि दुर्बलानें लयास जावें. हा जो प्रकार जीवंत कोटींत चालला आहे, त्यालाच विद्वान पुरुषांनी जीवनार्थ कलह असें नांव दिलें आहे. ह्यांतल्या कांहीं गोष्टी येथें सांगतों. · जीवंत पदार्थात मुख्य कोटि दोन; वनस्पतिकोटि आणि प्राणिकोटि. ह्यांपैकीं वनस्पतिकोटींत जीवनार्थ कलह चालला आहे कसा तो पाहा. शेतांमध्ये गवत वाढूं दिलें तर पीक चांगलें येत नाहीं. बागामध्यें रान माजूं दिलें तर त्याच्यापुढे फुलझाडें नाहींतशीं होऊन जातात. बरें, तो बाग वर्षानुवर्ष तसाच राहूं दिला, तर, पहिल्यावर्षी जें रान ती जमीन बळकावून बसतें, तेंच रान तींत शेवटपर्यंत २२