पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५५ ते शरीराला मात्र विश्रांति देतात असें नाहीं; तर लाही शांति देतात. तिचें मोल फार मोठें आहे. मना- आ पलें कर्तव्य करण्यांत आपण आपली पराकाष्ठा करून सो- डली ह्मणजे मन स्थिर राहातें; त्याला रुखरूख राहात नाहीं. त्यालाच सुख ह्मणतात. आणखी परमार्थसं- बंधानें देखील तसाच विचार आहे. जन्ममरणादिकांच्या उपयापापासून मुक्त होणें हाच मोक्ष अथवा हेंच स्वर्गसुख आहे, असा परमेश्वरभक्तांच्या वाणीचा आशय असतो. तो यथार्थ आहे. इहलोकीं ज्या मानानें श्रम करावे, त्या मानानें त्यांचें बक्षीस - विश्रांति मिळते. आणि असे पवित्र श्रम जन्मभर केले ह्मणजे देवाच्या घरीं अनंतकाळची वि श्रांति मिळते. हा केवढा मोठा लाभ आहे बरें ! - ह्मणून आपले कर्तव्य करण्यांत करवतील तितके श्रम करावे; आणि मग विश्रांति घ्यावी. तींत जें सुख आहे, दुसऱ्या कशांतही नाहीं. तें भाषणांतले अलंकार. • अधिक शोभा आणणें अथवा शोभेला भर घालणें हें अलंकाराचें कार्य आहे. नुसत्या पायापेक्षां तोडा घात- लेला पाय अधिक शोभायमान दिसतो; हाताच्या नुसत्या करांगुलीपेक्षां आंगठी घातलेली करांगुली अधिक शोभि- वंत दिसते; इत्यादि गोष्टींचा अनुभव साधारणपणें बहुतक- रून सर्वोस आहे. त्याप्रमाणेंच, भाषणांत जो अर्थ सां- गावयाचा असतो, तो नुसता सरळ सांगितल्यापेक्षां, दु- सऱ्या वस्तूच्या वर्णनाच्या आधारानें खुलविला ह्मणजे तो चटकर लक्षांत येतो, विशेष मनांत भरतो, आणि भाष-