पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/90

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६

व प्रामाणिक नौकर असें पाहून बाईसाहेबांनीं तेंच काम त्यांस सांगितलें. दौलतराव शिंदे ह्यांनीं सहा पायदळ पलटणी व त्यांच्या बरोबरच्या २० तोफा ह्यांच्या ताब्यात दिल्या होत्या, व त्यांच्या खर्चाकरितां स्वतंत्र मुलूख तोडून दिला होता. हे अहमदनगर जिल्ह्यांतील साकुरमांडव्याचे कुळकर्णी होते. परंतु केवळ स्वतःच्या कर्तबगारीने उदयास चढले. बायजाबाईसाहेबांनी ह्यांचा पूर्वींचा इतमाम ह्यांच्याकडे तसाच कायम ठेविला.

 लक्ष्मणराम विठ्ठलः- हे मूळचे दक्षिणेंतील चांभारगुंडी गांवचे रहिवासी होत. ह्यांचे वडील विठ्ठल महादेव ऊर्फ विठ्ठलपंत तात्या हे दौलतराव शिंद्यांच्या दरबारांत नामांकित मुत्सद्दी होते. ह्यांनीच इ. स. १८०३ सालीं, सर आर्थर वेलस्ली साहेबांबरोबर सुर्जीअंजनगांवचा तह ठरविला होता. ह्यांचें शहाणपण जाणून दौलतराव शिंदे ह्यांनी त्यांच्याकडे दरबारवकिलीचें काम सोपविलें होते. ह्यांचें सर आर्थर वेलस्ली, सर जॉन मालकम इत्यादि युरोपियन मुत्सद्यांवर चांगले वजन असे. त्यांचे चिरंजीव लक्ष्मणराव विठ्ठल हे होत. ह्यांस बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेरचे किल्लेदार नेमून, त्यांच्या सैन्याच्या खर्चाकरिता ग्वाल्हेरसभोंवतालची ५०।६० गांवें त्यांस जहागीर दिलीं.


 १ विठ्ठलपंत तात्या हे फार शहाणे व चतुर मुत्सद्दी होते. इंग्रजाकडील लष्करी मंडळींत विनोदाने ह्यांचे टोपण नांव “Old Brag” (ह्मातारा बढाईखोर) असे पडले होते. ह्या संबंधाने के साहेबांनी मालकमसाहेबांच्या चरित्रांत एक आख्यायिका दिली आहे. ती फार मौजेची व वाचनीय आहे. ती येणेप्रमाणें:-

 “He was a man far advanced in years, but of unbroken energy, and formed both by nature and habit for diplomatic address. His self-command was wonderful. He had a sour supercilious, inflexible countenance, in which no penetration could ever discern a glimpse of feeling. He wore, indeed, an