पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/38

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५

प्रसंग येईल. मराठी राज्य रक्षण करण्याचें काम नानांनी केले; परंतु महादजी शिंद्यांच्या स्वार्थपरायणतेने व महत्त्वाकांक्षेने ते सिद्धीस गेलें नाहीं; असा जो सर्व साधारण आक्षेप आहे, तो पुष्कळ चुकीचा आहे, असें अस्सल कागदपत्र सिद्ध करतील असें अनुमान आहे. खरोखर, महादजी शिंद्यांच्या अकालिक मृत्यूनें मराठी साम्राज्याचा मोठाच घात झाला, व परकीय सत्तेस प्रवेश करण्यास अनायासें संधि मिळाली ह्यांत शंका नाहीं. पाटीलबावा आणखी काही दिवस जगले असते व पुणेंदरबारांतील मत्सर थोडासा नाहींसा झाला असता, तर सर्व हिंदुस्थान संयुक्त होऊन मराठ्यांचें अवाढव्य व अजिंक्य साम्राज्य पुष्कळ काल टिकलें असते ह्यांत संशय नाहीं. परंतु ईश्वरी इच्छा निराळीच असल्यामुळे पाटीलबावांच्या मृत्यूनें मराठी राज्याचा नाश लवकर घडवून आणला, असेंच ह्मटलें पाहिजे.


 १ कर्नल म्यालेसन ह्यांनी महादजी शिंदे ह्यांच्या मृत्यूबद्दल लिहितांना जे उद्गार काढिले आहेत, ते वाचण्यासारखे आहेत. ते लिहितातः-

 "By the death of Madhaji Sindhia the Mahrattas lost their ablest warrior and their most farseeing statesman. In his life he had had two main objects: the one to found a kingdom, the other to prepare for the contest for empire with the English. In both, it may be said, he succeeded. The kingdom he founded still lives, and if the army which he formed on the European model was annihilated eight years after his demise by Lake and Wellesley, it had in the interval felt the loss of his guiding hand, as on the field it missed his inspiring presence. Had he lived, Sindhia would not have had to meet Lake and Wellesley alone; Madhaji would have brought under one standard—though in different parts of India-the horsemen and French contingent of Tippu, the powerful artillery of the Nizam, the whole force of the Rajputs, and every