पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हरि नारायण आपटेकृत
आजकालच्या गोष्टी
गोष्ट—३.
जग हें असें आहे!

 ज्यांनी आजकालच्या गोष्टी "मधली स्थिति” व "पण लक्षात कोण घेतो?" ह्या कादंबऱ्या वाचल्या आहेत त्यांस ही त्याच कादंबरीकाराची तिसरी गोष्ट किती सुरस असेल हे सांगावयास नकोच. शिवाय ही करमणूक पत्रात क्रमशः प्रसिद्ध झाली असल्यामुळे करमणुकीचे वाचकांस हिचा रसास्वाद मिळालाच आहे. तेव्हां हिच्या गोडीचे वर्णन करण्याची आता आवश्यकता नाहीं. लेखकाच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे या गोष्टींतही अनेकविध पात्रे आहेत. चार पाच इंग्रजी पात्रे आहेत. राजकर्ते आणि प्रजाजन यांचे अधिक संघटन होण्यास काय केले पाहिजे याचेही दिग्दर्शन आहे.
 सांचा "पण लक्ष्यांत कोण घेतो ?" या कादंबरीसारखा परंतु टाईप मोठा. पृष्ठसंख्या ५३५. पुस्तकांत गोष्टींतील कथानकास अनुसरून मुद्दाम विलायतेहून करवून आणलेली सुंदर पानभर अशी ७ चित्रे घातली आहेत. किंमत रु. २-८-० टपालखर्च ४ आणे व व्ही. पी. खर्च १ आणा.
   बाबाजी सखाराम आणि मंडळी,
      इसुफ बिल्डिग्ज, मुंबई.