Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५५

यश दंतकथांच्या योगानें मंद मंद होत चाललें आहे. तथापि, कांहीं पाश्चिमात्य ग्रंथकारांनीं व रसिक विद्वानांनी त्यांच्याबद्दल जे उद्गार काढिले आहेत, ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करीत आहेत. ग्वाल्हेरचे जुने रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी बाईसाहेबांच्या राज्यकारभाराची प्रशंसा केली असून, दौलतराव शिंद्यांनी त्यांच्याबद्दल "शहाणी बायको" (a woman of sense ) ह्मणून जे उद्गार काढले होते, त्याचा वेळोवेळी मोठ्या कौतुकानें उल्लेख केला आहे. शिंद्यांच्या दरबारचे दुसरे रेसिडेंट मेजर सदरलंड ह्यांनी त्यांच्यासंबंधानें "चतुर व स्वाभिमानी बायको" ह्मणून त्यांची स्तुति केली आहे. शिंद्यांच्या दरबारचे युरोपियन डाक्टर मि. होप ह्यांनी, "त्या काळची फार नामांकित स्त्री" ह्मणून आनंदभराने त्यांचा गौरव केला आहे. मिसेस ड्युबर्ली नामक आंग्ल युवतीनें, "बायजाबाई ही फार कार्यक्षम व साहसी असून हिंदुस्थानांतील फार प्रख्यात स्त्री आहे" असे ह्मटलें आहे. आणि मिसेस फेनी पार्क्स ह्या बाईनें, "बायजाबाईसारखी कृपाळू व सुस्वभावी स्त्री पाहिली नाही" असा स्तुतिपर उल्लेख आपल्या रोजनिशींत नमूद करून ठेविला आहे. त्या वेळच्या वर्तमानपत्रांतूनही बायजाबाईसाहेबांसंबंधानें प्रशंसापर लेख प्रसिद्ध झाले होते. 'मुंबई ग्याझेट' पत्रांत बायजाबाईसाहेबांचे मृत्युवृत्त आलें असून, त्यांत असे ह्मटलें आहे कीं, "बेगम सुमरू, नागपुरची राणी, झांशीची राणी, लाहोरची चंदाराणी, आणि भोपाळची बेगम ह्या सुप्रसिद्ध स्त्रियांप्रमाणे ही राजस्त्रीही, आपल्या परीनें, प्रख्यात असून, हिनें अनेक वेळां आपल्या देशाच्या शत्रूंशीं घोड्यावर बसून टक्कर दिली होती." अशाप्रकारें ह्या महाराणीच्या संबंधाने सर्वत्र स्तुतिपर उल्लेख दृष्टीस पडतात. ह्यावरून ह्या राजस्त्रीनें कुवि तुलसीदास ह्यांच्या

दोहा.

सुरतसे कीरत बडी बिनपंख उड़ जाय।
सुरत तो जाती रही, कीरत कबहू न जाय ॥ १ ॥