Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२३
अपमानाबद्दल शिक्षा.

 महाराजपुरची लढाई झाल्यानंतर बायजाबाईसाहेब नासिकाहून ग्वाल्हेरीस गेल्या. नंतर बरेच दिवस त्या लष्करामध्यें फुलबागेंत राहत असत. त्यांच्या तैनातीकरितां तेथे कांटिन्जन्ट फौजेपैकीं थोडेसे लोक (a guard of honour) व त्यावरील एक नेटिव अधिकारी असे ठेवण्यांत आले होते. त्यांनी बायजाबाईंच्या स्वारीबरोबर हरहमेषा राहावें व त्यांची स्वारी कोठें बाहेर जाईल त्या वेळीं त्यांस सलामी द्यावी, असें त्यांच्याकडे काम होतें. एके प्रसंगी बाईसाहेबांच्या स्वारीची प्रतीक्षा करीत, हे लष्करी लोक फुलबागेसमोरील मैदानांत उभे राहिले; परंतु त्यांच्या स्वारीस वेळ लागल्यामुळें, त्यांच्यावरील सुभेदारसाहेब कंटाळले, आणि विश्रांतीकरितां एका खुर्चीवर जाऊन बसले. बायजाबाईसाहेबांनी चिकाच्या पडद्यांतून ही गोष्ट पाहिली; व आपली स्वारी निघण्याचे शिंग झाले असतांना, हे सुभेदारसाहेब बंदूक घेऊन सलामी देण्याकरितां तत्पर


    what may be termed 'gentleman ushers' diplomacy were exerted to induce the Commander-in-Chief to take off his shoes when within a certain distance of the throne; but Major Macan, the Persian interpreter, declared that neither Lord Combermere nor any other English gentleman would submit to any other forms than those required at the court of his own Sovereign. After much argument the point was yielded, and Lord Combermere and his staff went, as one of the latter apt]y termed it, "booted and spurred like soldiers." The Mahratta, however, had his revenge, for the only seats at the grand durbar were saddle-cloths-articles of furniture characteristic of the warlike camp-life of the nation-on which the English officers, with tightly-strapped trousers and long sharp spurs, found it impossible to contrive a comfortable posture,”

    -Memoirs and Correspondence of Viscount Combermere.

    Vol. II. Page 197.