पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२१
आदरातिथ्य.

 बायजाबाई ह्या मनानें उदार असून आदरसत्कार करण्यांत फार तत्पर असत. ह्यांनीं लॉर्ड वुइल्यम बेंटिंक व लॉर्ड ऑक्लंड ह्या गव्हरनरजनरलसाहेबांच्या भेटी घेतल्या होत्या, व त्यांचा आदरसत्कार उत्तम प्रकारचा केला होता. त्या सर्व युरोपियन लोकांशी फार चांगल्या रीतीनें वागत, आणि त्यांचा सत्कार करण्यांत औदार्य दाखवीत. त्यांच्या पाहुणचारानें संतुष्ट झाला नाहीं, असा एकही युरोपियन गृहस्थ सांपडणें विरळा. बायजाबाईसाहेबांचे हे आदरकौशल्य पाहून युरोपियन लोक त्यांची फार तारीफ करीत असत.

स्वाभिमान व उपचारप्रियता.

 बायजाबाईसाहेब ह्या फार तेजस्वी व अभिमानी असून त्यांस मानपान विशेष आवडत असे व त्यांत यत्किंचित् देखील अंतर पडलेलें त्यांस खपत नसे. त्यामुळे त्यांच्या दरबारी लोकांस ह्याबद्दल फार काळजी बाळगावी लागत असे. त्यांत कोठें न्यून पडलें तर बाईसाहेबांकडून कडक शिक्षा होत असे. ह्या त्यांच्या सन्मानप्रियतेमुळें ग्वाल्हेर दरबारच शिस्त फार कडक व विशेष आदबशीर झाली होती. त्यामुळें एतद्देशीय लोकांस व युरोपियन लोकांस त्याबद्दल फार जपावें लागत असे. त्यांच्या दरबारचे शिष्टाचार ह्मणजे एकप्रकारची प्रतिष्ठित शिक्षाच होऊन राहिली होती. युरोपियन लोकांनी देखील बूट काढून त्यांच्या दरबारांत गेले पाहिजे, असा त्यांचा सक्त नियम असे. परंतु तो शिंद्यांच्या स्वातंत्र्याच्या उतरत्या कलेप्रमाणें पुढे नाहींसा होत चालला. ह्या उपचारप्रियतेमुळें बायजाबाईसाहेबांच्या दरबारात नेहमीं चमत्कारिक गोष्टी घडत असत. हिंदुस्थानचे मुख्य सेनाधिपति लॉर्ड कोंबरमियर हे इ. स. १८२९ सालीं ग्वाल्हेर येथे आले. त्या वेळीं