Jump to content

पान:बाबुर.pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४० ) सुसव वासव वानि असा करी; । मुनिजना निजनायक उद्धरी; ।। यश मला शमलापह ते रुचे; । ठकविते, कविते न दुजें सुचे. ॥ ६ ॥ (कृष्ण. ८०-४२) करिति विठ्ठलभक्त कथा वरी, । सुदृढ बाळहि जीस मनीं धरी; । वश जयासि सदा भगवान् हरि । कुतुक या तुकयापरि भूवरी. ॥ ७ ॥ (विठ्ठलभक्तस्तुति ५) | (‘विठ्ठलभक्तस्तुति' या प्रकरणांत पंतांनी रघुवंशाच्या नवव्या सर्गातील श्लोकांप्रमाणे प्रत्येक चतुर्थचरणांत संयुतावात मध्यपदयमक साधिलें आहे.) भव ! न तेऽवनते कठिनं मनः । सुरगुरो गुरोरिव भोगिनि ! ॥ कुरु चिरं रुचिरं शिरसीश मे । स्वपदमापदमाशु यदुद्धरेत्. ॥ ८ ॥ (शंकर स्तव २३ ) (इ) संयुतावृत्ति अंत्यपदयमकेंः फार तू श्रमलीस हिंस्रगणांचिया भवन वनीं । दुःखभीतिसमयावरि क्षितिकन्यके न मनीं मनीं ॥ प्रार्थिली असि पूजिली मग तापसीनिकरें करें। अर्पिलीं तिस कंदमूळफळे मुनिप्रवरे वरें. ॥ ९ ॥ (कुशलवा. ५-१४) । ह्मणे सत्या अत्यादृतमति मला हा वर वर; । खताताच्या गोष्टी प्रियसख ! ब-या या वरवर; ॥ ने पदीं कन्यारत्नार्पण न करि, मध्ये करकर । स्तुतीची; हा अंबे ! त्वरित धरु मोदाकर ! कर.॥१०॥ (कृष्णविजय५८-२१) पुढे येऊनियां भीमा वोले वागशिवा शिवाः ।। लवे लोचनही तीचे त्याकाळीं उजवें जवे. ॥ ११ ॥ (कुशलवा. ४-३) 2 शिशुच्या न रुचे शमनास मना; । जन शिक्षि, न तू वदना ! वद ना; वचके न निराशमना ! शमना; । वनवृत्ति भजे भवनाभ वना. ॥१२॥ (हररमणीय रामायण, ४६) (२) अयुतावृत्ति यमकेंः—(अ) अयुतावृत्ति आदिपद्यमकेंः तरणिवर बसुन झडकर तरणिकुलवरक्षमाभृदनुकूला ।। देवरतिकर नदीच्या देवरसह शीघ्र जाय परकूला. ॥ १३ ॥ (कुशलवा.४-१६) ओक आत्मधनस्त्रीतें ओक मानुनि मानसें । तोकवत् रोदन तदा तो करी ऐकतां असे. ॥ १४ ॥ (कुशलवा. ४-६४) । प्रभाव ज्याचा निःसीम प्रभा शुभ्र हिमाहुनी, ।। प्रभानुगुरु तो हर्षे प्रभासाप्रति पाहुनी. ॥ १५ ॥ (कृष्णविजय.७९-२७) तो दासाचा कल्पशाखी मोदामृतपयोनिधि । गोदावरीस जाऊनी, गोदाने दे यथाविधि. ॥ १६ ॥ (कृष्णविजय. ७९-१३)