पान:बाबुर.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वाध्याय १. बालपण : बाबुराचा जन्म केव्हा झाला ? त्याचा साखरपुडा कोणाशी ठरला ? केव्हां ठरला ? साखरपुडा म्हणजे काय ? शिवाजीमहाराजांचें लग्न केव्हां झालें ? त्या वेळी त्यांचे वय किती होते ? बाबुराचा पिता केव्हां मेला ? कसा ? उमरशेखच्या मरणानंतर बाबुरवर कोणची जबाबदारी येऊन पडली ?

  • छत्रचामरांमागे असंख्य कट्यारी असतात, • राजमुकुटास फड्या निवडुंगाचे कांटे असतात' म्हणजे काय ? बाबुराचे बालपण पाहिल्यावर मराठ्यांच्या इतिहासांतील कोणत्या व्यक्तीची आठवण होते ? कां ?

बाबुराला जीवनभर स्वास्थ्य कां मिळाले नाही ? सर्वसाधारण माणसाचे बालपण व बाबुर याचे बालपण यांत फरक कोणता ? स्वतःच्या लहानपणच्या आठवणी थोडक्यांत लिहा. २. राज्यास्थिति : बाबुर व उमरशेख यांची महत्त्वाकांक्षा काय होती ? आपल्या पित्याची इच्छा बाबुरानें केव्हां पुरी केली ? ' बाबुरच्या शरीरांत मोंगल व तुर्क या दोन्ही वंशांचे रक्त सळसळत होते . हे कसे ? बाबुराला आपले वंशपरंपरात आलेले फरघान्याचे राज्य टिकवण्यासाठी कोणाशी दोन हात करावे लागले ? कां ? ३. शत्रूचा बीमोड : बाबुरचे राज्य गिळण्यासाठी हात सरसावृन आलेले त्याचे नातेवाईक कोणचे ? अशा वेळी बाबुरनें कोणचे धोरण स्वीकारले १ ते योग्य होते का ? ' आपण स्वारी केली नसती तर बरे झाले असते ? असे अहंमदखानास कां वाटू लागले ? ते त्याचे मत बरोबर होते का ? कां ? महंमदखानाशी तो कोणत्या प्रकारे वागलो ? कां ? शिवाजीमहाराजांनी मोगलांशी तह करून कांहीं किले त्यांना दिले व दिल्लीला औरंगजेबाचे भेटीस येण्याचे कबूल केले यांत धोरण कोण वें होत ते शिक्षकांकडून समजावून घ्या.