पान:बाबुर.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६

बाबुर मारण्यांत गेले. त्याने अनेक लढाया जिंकल्या, राज्ये कमाविली आणि घालविली. वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी तो दिल्लीचा दिल्लीपति झाला. त्यानंतर मात्र त्यास थोडे चित्तस्वास्थ्य लाभले आणि राज्याला स्थैर्य आणण्याच्या उद्योगास तो लागला. बंडखोर लोकांना वचक बसावा, त्यांनी लूटमार करून रयतेस सतावू नये म्हणून बाबुराने अत्यंत उग्र स्वरूप धारण केले होते. पंजाबांत लूटमार करून लोकांचा निःपात करणारे पेंढार फार होते. हे लोक जाट व गुजर जातीचे असून ते कडेपठाराच्या आश्रयाने राहात आणि डाके घालून आपली गुजराण करीत. पूर्वी हिंदुस्थानवर चढाई करून येत असतां या लोकांनी बाबुरास व त्याच्या लष्करास त्राहिभगवान् करून सोडले होते. डोंगरावरून हे लोक एखाद्या विजेप्रमाणे कोसळत आणि भयंकर कत्तली करून वाटसरूंचा निकाल लावीत आणि पैका लांबवीत. या बंडखोरीमुळे पंजाबांत कोणतीच सत्ता नांदत नव्हती. | बाबुराने आतां आपली सत्ता तेथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला होता. जरा बंदोबस्त ढिला पडतांच हे लोक बंडे करून उठत व रयतेस सतावीत व लोकांचे जीवित धोक्यांत आणीत तेव्हां बंडखोरांना पकडून त्यांना कडक शासन करण्याचा तडाखा आतां सुरू झाला. या बंडखोर लोकांच्या-- पैकी दोन-तीन मुखंडांना पकडून त्यांचें रयतेसमक्ष बाबुराच्या हुकुमानें राईराईएवढे तुकडे करण्यांत आले. या गोष्टींचा योग्य तो परिणाम झाला. सरहिंदच्या बाजूस मुंडाहिर लोक असेच लुटारू होते. पेंढारीपणा करून ते रयतेस सतावून सोडीत. त्यांच्यावर वचक बसावा म्हणून बाबुराने असेच उग्र स्वरूप धारण केले होते. बाबुराचा मुक्काम सरहिंदला असतांना एका काजीनें बादशहाजवळ अशी तक्रार केली की, मोहन मुंडाहिर नांवाच्या एका गृहस्थाने त्याची जिंदगी लुटून जाळून बेचिराख केली व त्याच्या मुलास ठार केले. ही कागाळी ऐकून बाबुर संतापला. त्याने लगेच ह्या