पान:बाणभट्ट.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ६४ ) याप्रमाणे कादंबरींत देखीलं पूर्वीच्या एका कथानकाचा आधार घेतला आहे, तरी त्यांत त्याचे अनुपम कवित्व आढळून येतच आहे ! प्रत्येकाचें निरनि- राळ्याप्रकारचे चमत्कारजनककवित्व व कल्पना असल्यावर अन्य ग्रंथांतला आधार घेतला असला तरी कोणासहि दोष देणें युक्त आहे असे मला वाटत नाहीं ! कै० विष्णुशास्त्री चिपळूणकरासारख्या सहृदय विद्वानाकडून अशा तऱ्हेचा अभिप्राय कसा देण्यांत आला हे मात्र समजत नाहीं ! दोन्ही काव्यांत एकच गोष्ट व थोडी समानार्थक वाक्यें हीं दृष्टीस पडल्याबरोबर त्यांनी हैं काव्य नीट रीतीने सर्व पाहण्याचें सोडून देऊन आपले मत अर्से ठाम केलें कीं काय कोण जाणे ! कुमारसंभवांतील कोठलें तरी थोडें अर्थसादृश्य ज्यांत जमलें आहे अशीं पार्वतीपरिणयांतील बरीच पधें व कुमारसंभवां- तीक पर्छे अशीं दोन्ही ताडून पाहण्याकरितां पुढे एकाखाली एक सादर केली आहेत. ती पहावीं ह्मणजे जरी कोठें एखादें दुसरे वाक्य किंवा कांहीं अर्थसादृश्य जमल्यासारखें दिसले, तरी प्रस्तुत कवीच्या कल्पना निराळ्या वॅ त्याहि चांगल्याप्रकारच्या असेंच आढळून येईल. ह्यांतील स्वतंत्र कवितेचे मासले व नाटकांतील कांहीं भागहि पुढे दिले आहेत. त्यावरून ह्या कवीच्या स्वतंत्र कवित्वाचा मासला कळून येईल. सारांश, दोन्ही कस सहृदयविद्वज्जनांच्या नजरेपुढे ठेवले आहेत, ते त्यांनी योग्य रीतीनें मात्र पारखून पहावे ! पार्वतीच्या तारुण्याचें वर्णन. . कुमारसंभवः - - असंभृतं मण्डनमङ्गयष्टेरनासवाख्यं करणं मदस्य । कामस्य पुष्पव्यतिरिक्तमस्त्रं वाल्यात्परं साथ वयः प्रपेदे ॥ पार्वतीपरिणयः- कुमारसंभवः - - आसेचनकतनुश्रीरंतःकरणस्य किमपि संवननम् । सा खळु गिरिराजसुता संमोहनमस्त्रमेव पुष्पेषोः ।। इन्द्राच्या सहस्र नेत्रांस अनुलक्षून दोघां कवींनीं भिन्न भिन्न रीतीने केलेले वर्णन. . तस्मिन्मघोनस्त्रिदशान्विहाय सहस्रमणां युगपत्पात | प्रयोजनापेक्षितया प्रभूणां प्रायश्चलं गौरवमाश्रितेषु ॥