पान:बाणभट्ट.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उदार आश्रय मिळावा; असा हा निबंध आहे. युनिव्हर्सिटीच्या परीक्षा देणा- हा अवश्य वाचावा. मुक्काम मुंबई, ता. २-१-०५. ( सही ) विष्णु मोरेश्वर महाजनी एम्. ए. ए. इन्स्पेक्टर, प्रांत वन्हाड. वेदशास्त्रसंपन्न रा. रा. पांडुरंग शास्त्री पारख़ी-मुक्काम पुणे स्वामीचे सेवेशी:- कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विशेष आपला ' बाणभट्ट ' नांवाचा ग्रंथ आपले चिरंजिवांनीं मजकडे आणून दिला तो पोहोचला. पुस्तक वाचून पाहतां फार उपयोगी झाले आहे असे दिसून आले. अंतर्बाह्य कारणांवरून कालविवेचन करण्याची पद्धति मराठी ग्रंथांत अजून फार कमी आहे. तशा प्रकारचा हा ग्रंथ असलेमुळे कोणतेही काव्यग्रंथांतील अर्थगांभीर्य व रसपेष इत्यादि मार्मिक गोष्टीबरोबर थोडथोडी ऐतिहासिक दृष्टिहि वाचकांमध्ये उद्भवेल अशी आशा आहे. शिवाय कोणत्याही कवीच्या कृतीचें सर्व बाजूं. नीं परिशीलन कसें करावें ह्याचें वळण आपले पुस्तकावरून वाचकांस चांगले लागेल असे मला वाटतें. एकंदरीनें विचार करितां कै. विष्णुशास्त्री यांच्या या कवीवरील निबंध - पेक्षा आपला हा निबंध जास्ती उपयोगी आहे. कोठें कोठें मतभेद दाख- वितां येईल असें विधान कोठेही केलेले आढळून येत नाहीं. निबंधाची भाषा- हि चांगली व सुबोध आहे. आपल्या ह्या ग्रंथास मराठी वाचकांचा चांगला आश्रय मिळेल तर अशा ग्रंथांस उत्तेजन येऊन मराठीमध्ये चांगले ग्रंथांची भर पडेल असे मला वाटतें. याप्रमाणे मराठी कवींवरही पूर्ण विवेचनाचे व विस्तृत ग्रंथ होतील तर फार उपयोग होईल असे वाटतें. कळावें लोभ असावा हे विनंति. श्रावण शु. ३ रोज गुरुवार ) (सही) हरि महादेव भडकमकर. एम्. ए. गिरगांव मुंबई. सं. प्रोफेसर उइल्सन कॉलेज. मुंबई.