पान:बाणभट्ट.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४४ ) बाणकवीचे प्रस्तुत उपलब्ध असे मोठे ग्रंथ दोनच आहेत. हर्षचरित व दुसरी कादंबरी. हर्षचरित है बाणकवीने स्वतः आपल्या व ज्याच्या पदरीं तो होता त्या हर्षराजाच्या घराण्यांत घडून आलेल्या कांहीं गोष्टींच्या आधारानें रचलेलें आहे. यांतील वर्णन बरेंच ऐतिहासिक असून कवित्वासहि अनुसरून आहे. कादंबरीतील कथानक बृहत्कथेंतून घेतलेले आहे. परंतु ते केवळ आधार मात्र होय. बृहत्कथेचें विस्तृत भाषांतर कथासरित्सागर यांत देखील हे कथानक चार पानांत वर्णिलेलें आहे ( पहा क. स. सा. शक्तियशोलंबक, तरंग ३). चार पानांच्या आधारानें येवढा मोठा विस्तीर्ण ग्रंथ बाणाने केला आहे, तेव्हां यास मूळग्रंथासारखेंच महत्त्व देणे आवश्यक आहे ! तारापीडराजाच्या सभेचें वर्णन, राघूस राणीकडे पाठविणें, तारा- पीडाच्या स्नानाचें वर्णन, राजपुत्रासह भोजन, मिल्लांच्या शिकारीचें विस्तृत वर्णन, तारापीडानें पुत्राच्या विद्याभ्यासाकरितां विद्यालय बांधून त्यांत चंद्रापीडास मित्रांसह ठेवणें, तो तेथून आल्यावर शुकनासप्रधानाचा लांब. लचक मार्मिक असा उपदेश, यौराज्याभिषेक इत्यादि प्रकरणें पाहिली असतां कादंबरी हा ग्रंथ मूळग्रंथाप्रमाणेंच झाला असल्याची खात्री होते. वाणानें मूळगोष्टींत जागजागीं फेरबदल केले आहेत. बाणपुत्रानें तर पुढील सं विधानकांत देखील बराच फरक केला आहे. प्रसन्न महानद्यांत जसे तरंगावर तरंग चालतात, तसे कादंबरीत व हर्षचरितांत बाणकवीचे व त्याच्या पुत्राचे कल्पनातरंग आढळतात. या ग्रंथास यांतील मुख्य नायिका कादंवेरी ( गंधर्वकन्या ) इर्चेच नांव दिले आहे, व तें साहित्यशास्त्रांतील नियमास अनुसरूनच आहे. , बाणकवीनें हर्षचरितांत व कादंवरींत आणि त्याच्या पुत्रानें उत्तरा- धौत मधुरवर्णरचना, श्लेषोत्प्रेक्षा दि अनेक अलंकार, हुबेहूब वर्णनें, खुबीदार संभाषण आणि मनास थक्क करणारे शब्दार्थचमत्कार इत्यादि प्रकार इतके सुरेख घातले आहेत की, ते वाचीत असतां रसिक विद्वज्जन आनंदरसांत अगदी तल्लीन होऊन जातात ! वाण हा लहानपणी अनेक देश हिंडून आला असल्यामुळे व त्याची 6 १ मराठीत असा चमत्कार झाला आहे कीं कल्पित गोष्टीस अंधपरंपरेनें कादंबरी ' हुंच नांव देण्याचा परिपाठ पडला तो पडला आहे !