पान:बाणभट्ट.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) I have read portions of Pandurang Shastri's work and I am of opinion that the book will prove highly useful and entertaining to Marathi readers. His work on Banabhatta deserves the patronage of the public as he has laid under contribution the writings of distinguished foreign authors which are not accessible to ordinary students. Poona, 7th October 1902. } (Sd.) K. B. PATHAK. B. A. ( Prof of Sanskrit, Deccan College, Poona. ) , वे. शा. सं. रा. रा. पांडुरंग गोविंद शास्त्री पारखी यांनी लिहिलेले बाणकवीचें चरित्र व त्यावरील निबंध मी समप्र वाचून पाहिला आहे. बाणकवि आणि त्यास आश्रय देणारा श्रीहर्ष या दोघांच्याही संबंधानें ताम्र- पट, शिलालेख, चिनी प्रवाशांचे ग्रंथ, यांतून व बाणकवीच्या सांप्रत उप- लब्ध झालेल्या श्रीहर्षचरित्रांतून जी माहिती मिळण्यासारखी आहे, तेवढी सर्व पांडुरंगशास्त्री यांनी आपल्या निबंधांत व्ययस्थित रीतीनें घातली आहे. कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी बाणकवीवरील जेव्हां निबंध लिहिला तेव्हां ही माहिती उपलब्ध नव्हती; यामुळे विष्णुशास्त्री यांच्या बाणभट्टा- वरील निबंधापेक्षां पांडुरंगशास्त्री यांचा हल्लींचा निबंध विद्यार्थ्यास व वाचकां- स अधिक उपयुक्त व मनोरंजक झाला आहे. हर्षचरित्रांतील नायक हाच रत्नावली, नागानंद, वगैरे नाटकांचा कर्ता आहे, हेंही हल्लींच्या निबंधांत सप्रमाण दाखविले आहे. सारांश, बाणकवि आणि श्रीहर्ष यांच्याबद्दल जितकी माहिती मिळणे शक्य होतें. तितकी मिळवून प्रस्तुत ग्रंथ लिहिला आहे. अशा रीतीनें झणजे नव्या ऐतिहासिक पद्धतीने लिहिलेले निबंध मराठी भाषेत फारच थोडे आहेत; व त्यांतून ज्यांचा अभ्यास जुन्या शास्त्रीलोकांच्या पद्धतीनें झालेला, अशा लोकांकडून तर मराठीत अशा प्रकारचा ग्रंथ हा पहिलाच माझे पाहण्यांत आलेला आहे. पांडुरंगशास्त्री यांनी कादंबरीचें सार मराठीत प्रसिद्ध केले आहे; तेव्हां त्यांचा बाणकवीच्या ग्रंथांशीं कितपत परिचय आहे हे सांगावयास नकोच. निबंधाची भाषा सरळ व सोपी असून शेवटीं बाणकवीच्या ग्रंथांतून जे उतारे दिले आहेत तेही मार्मिकपणानें निवडलेले असून त्यांपासून बाणकवीच्या लेखनशैलीचा