पान:बाणभट्ट.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३८ ) हरलीलेव नो कस्य विस्मयाय बृहत्कथा आठ्यराजकृतोत्साह्रैर्हृदयस्थैः स्मृतैरपि जिव्हान्तःकृष्यमाणेवन कवित्वे प्रवर्तते || " बाणकवीनें आरंभी शंकर व पार्वती यांनां नमस्कार केल्यावर व्यासाला नमन करून त्याजबद्दल आपली पूज्यबुद्धि व्यक्त केली आहे. त्या नंतर वाचाळ व दुसऱ्याच्या कवितेतील मजकूर घेऊन बदलणारे चोरटे कवि यांचें वर्णन केले आहे. 66 अन्यवर्णपरावृत्या बन्धचिनिगूहनैः । अनाख्यातः सतां मध्ये कविश्चौरो विभाव्यते ॥ " ह. च. उ. १. पद्य ६. दुसऱ्या कवींच्या ग्रंथांतील वर्णादिकांची फिरवाफिरव वगैरे करणारा चोरटा कवि विद्वज्जनांमध्ये असला तरी न सांगतांहि कळून येतो! असा याचा अर्थ असून हालसाहेब हे चोर नांवाच्या कवीचें वर्णन आहे असे ह्मणतात. तेव्हां हालसाहेबांनी आपल्या नांवाप्रमाणे ह्या पद्याच्या अर्थाचे हाल मात्र केले आहेत असेच ह्मणणे भाग आहे ! बुलरसाहेबाह हालासच अनुसरले आहेत ! असो, पुढें कोठकोठल्या कर्वीत कोणकोणते विशेष गुण असतात, त्यांचें वर्णन केले आहे - उत्तरेकडच्या कवत श्लेष गुण, पश्चिमे कडच्या कवीत अर्थगौरव, दक्षिणेकडच्यांत उत्प्रेक्षाद्यलंकार, आणि गौड ( पूर्वेकडच्या ) कवीत अक्षरराडंबर-शब्दालंकार असल्याचे वर्णन केले आहे. बाणाने व्यासाला 'सर्वज्ञ' व 'कविवेधस्' (कवींसले किंवा कवींचे ब्रह्मदेव ) - १ ह्या व्यासनमनाच्या पद्यावर पिटर्सनसाहेबांनी असा तर्क केला आहे की बाणाच्या वेळीं महाभारताचे ताजे आश्चर्य ( a fresh wonder ) वाटत नव्हते काय ? (See Intro. to Kadambari P68 ) बाणाच्या वेळी महाभारताचें अगदीं नवें आश्चर्य होते असे मला बिलकूल वाटत नाहीं ! तर त्या काळी त्याचें प्राचीनत्व जगजाहीर असल्याबद्दल बाणाच्याच लेखावरून ठरतें ! " किं कवेस्तस्य काव्येन सर्ववृत्तान्तगामिनी । कथैव भारती यस्य न व्याप्नोति जगत्त्रयम् || " भारतीकथेनें जगत्त्रय व्यापले असल्याचें बाणानेंच जर हाटले आहे तर तिचे त्या कालांतहि प्राचीनत्व उघडच सिद्ध होते. असे असून साहेबांस महाभारताचे ताजें [ नवें ] आश्चर्य करें वाटले ते समजत नाहीं ! सारांश साहेबानीं मनास वाटेल तसे तर्क चालविले तरी ते विद्वत्तेत गणले जातात !