पान:बाणभट्ट.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३६ ) प्रतापोपनता यस्य लाटमालवगुर्जराः । दंडोपनतसामन्तचर्यावर्या इवाभवन् । अपरिमितविभूतिस्फीतसामन्तसेना- मुकुटमणिमयूखाकान्तपादारविन्दः युधि पतितगजेंद्रानीकवीभत्स भूतो- भयविगलितहर्षो येन चाकारि हर्षः ।। यस्यांवधिवयनिवारितशासनस्य सत्याश्रयस्य परमाप्तवता प्रसादम् । शैलं जिनेंद्रभवनं भवनं महिम्नां निर्मापितं मतिमता रविकीर्तिनेदम् ॥ येनायोजि न वेश्म स्थिरमर्थविधौ विवेकिना जिनवेश्म | स विजयतां रविकीर्तिः कविताश्रितकालिदासभारविकीर्तिः ।। पंचाशत्सु कलौं काले पट्सु पंचशतासु च - ( श० ५५६ ) समासु समतीतासु शकानामपि भूभुजाम् ॥” शके ५५६ ह्मणजे ( इ० स० ६३४-३५ ) ह्यावर्षी महापराक्रमी हर्ष- राजा याचा सत्याश्रयानें पराभव केल्याबद्दल वरील लेखांत रविकीतीनें उल्लेख केला आहे. ' रविकीर्ति' याने आपण त्या राजाच्या प्रेमांतले अस- ल्याबद्दल, धर्मादिपुरुषार्थ साधण्याकरितां देवालय बांघल्याबद्दल आणि कालिदांस व भारराव यांच्या समान आपण असल्याबद्दलहि त्यांत उल्लेख केला आहे. सुमारें इ०स० ६२० त हर्ष व सत्याश्रय यांच्यांत युद्धप्रसंग घडून आला असावा, असे ठरविण्यांत आले आहे. वरील लेखांतील शककाल आणि ' उत्तरापथेश्वर " हर्षवर्धन, हर्ष' इत्यादि नामनिर्देश आणि 6 १ यावरून ' कालिदास ' व ' भारवि ' हे ह्या कालाच्या पूर्वी होऊन गेले हैं अर्थातच सिद्ध झाले. कालिदासाची प्रशंसा तर पुष्कळांनीं केलीच आहे, व बाणकवी- नेंहि पुढे दिलेल्या कविप्रशंसंत फारच चांगल्या रीतीनें केली आहे. त्रिविक्रमभट यानें ' भारवि ' व ' माघ ' यांची प्रशंसा एका पद्यांत केली आहे. ते पद्य सरस वाटल्यावरून येथे दिले आहे. " कृत्स्नप्रबोधकद्वाणी भा खेरिव भारवेः । माघेनेवच माघेन कम्पः कस्य न जायते ! ॥ "