पान:बाणभट्ट.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ ( ३० ) राजाची गणना आहे. त्याच्या कारकीर्दीत बौद्धधर्मास फारच उत्तेजन मिळून अगदी पराकाष्ठा झाली ! लोकांनीं अशोकाचा सन्मान केला व ' येथील अधिकाऱ्यांच्या जुलमी वर्तनामुळे आह्मीं बंड केलें' असे सांगितलें. अशोकानें या गोष्टीचा बंदोबस्त केला. त्यानें तेथें असतां काश्मीरदेशावर स्वारी केली व चहूंकडे आपला दरारा बसविला. पुढे अशोका- ची बदली उजयनी येथील सुभेदारीच्या कामावर केली. तो तिकडे जात असतां त्याचा मुक्काम वीसनगर येथे पडला असतां तेथील एका गृहस्थाच्या मुलीशी त्यानें विवाह केला. 'न रूपमालोकयते' ! असें लक्ष्मीचे वर्णन बाणाने केले आहे तें व दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनमाश्रयंति" असें भर्तृहरीनें ह्मटलें आहे तें अगदी यथार्थ आहे, ह्मणूनच तेथील गृहस्थास अशोकाचें कुरूप न दिसतां सुस्वरूपच दिसलें ! पुढें अशोक उजयनीस गेला. (6 स च 4 झाला. इकडे तक्षशिला येथील लोकांनी पुनः बंड केलें तें मोडण्यास बिंदुसारानें या- वेळी सुशिमास पाठविले. मागें बिंदुसारास असाध्य व्याधि होऊन तो मरणोन्मुख सुशिमावरहि कांहीं कारणानें राजाची मर्जी खप्पा झाली होती, यामुळे गादी कोणास द्यावी हाणून त्यानें आपल्या प्रधानास विचारलें, प्रधानाचें व सुशिमा- चेंहि बिघडलें होतें, त्यामुळे त्यानें अशोकास ती देण्याविषयीं राजाचें मन वळविलें. तथापि त्यानें असें ठरविलें कीं तूर्त अशोकानें राज्यकारभार पहावा व सुशिमा आल्यावर तो त्यास द्यावा. आपला अंतकाळ जवळ आला असे पाहून त्यानें सुशिमास बोलावून आणण्यास प्रधानास सांगितले. परंतु त्यानें तसे न करितां अशोका- सच बोलावून आणिलें! त्यास पहातांच राजाला इतका संताप आला कीं, तो लागलींच बेशुद्ध पडला. तो पुनः शुद्धीवर आला नाहीं ! हा राजा इ. स. पूर्वी २७१ व्या वर्षी वारला. पुढे अशोकानें राज्य बळकाविलें. बाप वारल्याचे कळतांच सुशिमा तेथून निघाला. वाटेंतच त्याला अशोकानें राज्य बळकावले असे समजलें, तेव्हां त्याला संताप येऊन व कांहीं सैन्य जमा करून तो अशोकावर • चाढून गेला. अशोक हा स्वतः शूर असून त्याच्या ताब्यांत पुष्कळ सैन्य होतें, या- मुळे मुशिमाचा मोड करण्यास त्यास अडचण पडली नाहीं. अशोकानें क्रूरपणानें आपल्या बंधूंची कत्तल केली, असेंहि वर्णन आहे. "नाभिजनमीक्षते"! अर्से बाणानें लक्ष्मीच्या करामतीचें वर्णन केले आहे तें खोटें नाहीं! असो, त्याच्या भावांपैकी तिष्य हा बौद्धजती झाला, त्यावर मात्र त्यानें शस्त्र चालविलें नाहीं. बंधुवधाची गोष्ट खोटी असेंहि कित्येक ह्मणतात. अशोकानें कलिंगदेश जिंकला, तेव्हां दोन्ही पक्षां- कडील एक लक्ष प्राणहानि झाली यामुळेच त्यास क्रूरकर्माचा पश्चात्ताप झाला असेंहि कोणाचें मत आहे. त्याच्या राज्याभिषेकासंबंधानें अनेक मतभेद आहेत, तथापि तो स० पूर्वी२७२व्या वर्षी सिंहासनावर बसला व इ० स० पूर्वी २४० सांत तो वौद्धजती झाला असे व्हिन्सेंट स्मिथचे इतिहासांत आहे.